पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें. ] ट्यूडर घराण्याच्या अमदानीतील इंग्लंड. ६५ (मेरी १५५३ ते १५५८ ) ६ वा एडवर्ड मरण पावला नाहीं तोंच नॉर्दबरलंडनें 'जेन ग्रे' ही इंग्लंडची राणी असल्याचें जाहीर केलें, परंतु आठव्या हेन्रीची मुलगी मेरी हिचाच गादीवर हक्क असल्यानें ' जेन ग्रे ' हिला कोणीच ओळखीना ! रोमन कॅथलीक पंथाच्या लोकांना तर मेरी इंग्लंडची राज्ञी होणार हैं पाहून अत्यानंद झाला. गादीवर आल्यावर तिनें नॉर्दबरलंडने आपल्या विरुद्ध कट रचला होता हें पाहून त्याचा शिरच्छेद करविला इतकेंच नव्हे तर त्याच्या कटांत सामीलं म्हणून बिचाऱ्या जेन ग्रेला मात्र व्यर्थ प्राणास मुकावें लागलें ! आपल्या विरुद्ध असलेल्या सर्वांचा नाश होऊन आपलें राज्ञीपद स्थिर झालें आहे, हें पाहून मेरीनें इंग्लंडमध्यें पुनः पूर्ववत् रोमन कॅथलीक पंथाचा प्रसार करण्याचा निश्चय केला. ८ व्या हेन्रीनें पोपचा व इंग्लंडचा तोडलेला संबंध पुनः जोडण्यासाठीं तिनें इंग्लंडच्या राजास किंवा राज्ञीस धार्मिक बाबतींत मुख्य ठरविणारा कायदा रद्द करून टाकला च पोपचें इंग्लिश चर्चवरील वर्चस्व कबूल केलें. या वेळीं इंग्लंडमधील बहुजनसमाजाचा कल जरी रोमन कॅथलीकपंथाकडे होता, तरी मेरीच्या वरील कृत्यानें त्यांस बरें वाटलें नाहीं; कारण इंग्लंडच्या राज्यकारभारांत पोपकडून ढवळाढवळ होईल अशी त्यांना भीति वाटू लागली. ६ व्या एडवर्डच्या कारकीर्दीत प्रॉटेस्टंटधर्माच्या प्रसारार्थ करण्यांत आलेले सर्व कायदे आतां मेरीच्या अमदानीत रद्द करविण्यांत आले व रोमन कॅथलीकपंथाच्या विरुद्ध ज्यांचें आचरण असें अशा धर्माधिकाऱ्यास आपल्या धर्मपीठावरून काढून टाकण्यांत आलें. अशारीतीनें मेरीनें पोपची सत्ता कबूल करून रोमन कॅथलीक पंथाचा प्रसार इंग्लंडमध्यें करण्याचें ठरविल्यावर पोपनेंही इंग्लंडला पुनः कॅथलीक पंथामध्यें घेण्यासाठी आपला पोल नांवाचा प्रतिनिधी इंग्लंडमध्यें पाठविला.