पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ इंग्लंडमध्यें प्रॉटे- स्टंट पंथ प्रस्थापित करण्यांत येतो. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण पंथाकडेच कल असल्यामुळें, त्याच्या सल्ल्यानें सर्व चर्चमधून रोमन कॅथ- लिक पंथाचे आचार बंद करण्यांत आले. चर्च- मधील चित्रे व उंची वस्तु काढून टाकण्यांत येऊन लॅटीन भाषेमधील प्रार्थनेऐवजी इंग्रजी भाषेंत प्रार्थना म्हणण्यांत येऊ लागली. १५४९ मध्ये कॅन्मरनें इंग्लिश भाषेमध्यें प्रार्थनेचें पुस्तक तयार केलें; व यानंतर हेन्रीनें प्रसिद्ध केलेलें सहा कलमांचें पत्रक रद्द करण्यांत येऊन प्रॉटेस्टंट पंथास अनुसरून ४२ कलमांचें एक पत्रक प्रसिद्ध करण्यांत आलें. सॉमरसेटकडून प्रॉटेस्टंट पंथाचा पुरस्कार करण्यासाठी प्रयत्न होत असतां रोमन कॅथलिकपंथीय लोकांत असंतुष्टता पसरूं लागली; व १५४९ मध्ये सरदार लोकांच्या एका कटास त्यास बळी पडावें लागलें. सॉमर- सेटच्या मृत्यूनंतर नॉर्दबरलंड नांवाच्या सरदाराने राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे आपल्या हातांत घेऊन, सॉमरसेटच्या धोरणाप्रमाणेंच इंग्लंडमध्यें प्रॉटे- स्टंट पंथांचा प्रसार करण्याचा निश्चय केला. इकडे ६ वा एडवर्ड याची प्रकृति बरीच नादुरुस्त असून तो आतां फार दिवस वांचत नाहीं असें सर्वांस वाटूं लागलें. एडवर्डनंतर हेन्रीच्या इच्छेप्रमाणें कॅथराईनची मुलगी मेरी यावयाची असून, ती रोमन कॅथलीक पंथाची कट्टी अनुयायी असल्यामुळें, हिच्या अमदानीत प्रॉटेस्टंट पंथाचा नायनाट करण्यांचे प्रयत्न करण्यांत येतील हें पाहून नॉर्दबरलंडला फार- च भीति वाटूं लागली. तेव्हां आतां कसेंही करून मेरीला इंग्लंडच्या गादी- वर येऊं न देण्याचा कट तो रचूं लागला; व याच हेतूनें त्यानें एडवर्डचें मन वळवून त्याच्याकडून “सातव्या हेन्रीची पणती जेन ग्रे हिनें आपल्या- नंतर गादीवर यावें ” असें मृत्युपत्र करवून घेतलें; व या भावी राज्ञीवर वर्चस्त्र रहावें म्हणून आपला मुलगा डडले याचें जेन ग्रेशीं लग्न लावलें ! वरील प्रकारचें मृत्युपत्र केल्यावर १५५३ मध्ये सहावा एडवर्ड मरण पावला.