पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें. ] ट्यूडर घराण्याच्या अमदानींतील इंग्लंड. ६३. एडवर्ड नांवाचा एक मुलगा झाला. परंतु कांहीं वर्षांनंतर जेन सेमूर मेल्या- वर त्यानें ॲन क्लेव्हीस हिच्याशी लग्न केलें, परंतु ही स्त्रीही त्यास न आवडून हिचा शिरच्छेद कर- ण्यांत आला. ८ व्या हेन्रीचे पांच विवाहसंबंध. यानंतर त्याने कॅथराईन हॉवर्ड नांवाच्या स्त्रीशी लग्न केलें, परंतु ही स्त्री वाईट चालीची आहे अशी शंका येतांच, हिचा वध करविण्यांत येऊन कॅथराईन पार नांवाची स्त्री त्याच्याशीं विवाहसंबंधानें बद्ध झाली ! या स्त्रीची मात्र हेन्रीच्या इतर बायकांप्रमाणे गत न होतां ती आपल्या नवऱ्याच्या मरणानंतर जिवंत राहिली ! १५४७ मध्यें ८ वा हेन्री मरण पावला. आपल्यानंतर इंग्लंडच्या गादीवर कोणीं यावें, याबद्दल मृत्युपत्र करण्याचा त्यास पार्लमेंटनें अधि- कार दिला होता, व त्याप्रमाणें एडवर्ड, मेरी व इलिझाबेद यांनीं अनुक्रमें इंग्लंडच्या गादीवर यावें अशी त्यानें मृत्युपत्रामध्यें व्यवस्था केली होती. ( सहावा एडवर्ड १५४७ ते १५५३. ). एडवर्ड अगदींच अल्पवयी असल्यामुळे ८ व्या हेन्रीनें आपल्या मरणसमयीं, एडवर्ड वयांत येईपर्यंत त्यास सल्लामसलत देण्यासाठीं, त्याचा मामा ड्यूक ऑफ सॉमरसेट याच्या नेतृत्वाखालीं एक मंडळ नेमावें असें सुचविलें होतें. परंतु हेन्री मृत्यु पावतांच सॉमरसेटनें त्या मंडळाची सत्ता झुगारून देऊन आपल्याच हातांत राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे घेतलीं व 'राष्ट्रसंरक्षक' असा किताब धारण केला. या वेळीं राष्ट्रांतील सर्वांत महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे धार्मिक होय ! हेन्रीनें आपल्या अमदानींत दोन्ही पंथांच्या कट्ट्या अनुयायांस दुखविलें असल्यामुळें त्याच्या वेळेस दोन्हीही पंथांतील लोक असंतुष्टच होते. परंतु आतां सॉमरसेटच्या हातांत राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे आल्यावर इंग्लंडमध्यें प्रॉटेस्टंट पंथ स्थापन करण्याचा त्यानें निश्चय केला. कॅटेरबरीचा आर्चबिशप कॅन्मर याचा देखील प्रॉटेस्टंट-