पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरणा नव्हे तर उलट रोमन कॅथलीक पंथाच्या कांहीं आचारांकडेही त्याचा कल जाऊं लागला, असें म्हणण्यास हरकत नाहीं. पोपची इंग्लंडवर असलेली हुकमत कमी करण्यापलीकडे रोमन कॅथलीक पंथामध्यें कांहीं महत्त्वाच्या सुधारणा कराव्यात असें त्यास वाटत नव्हते. पोपची इंग्लंडवर अस- लेली सत्ता झुगारून देऊन आपल्या हातांत अनियंत्रित सत्ता ठेवल्यावर रोमन कॅथलीक पंथाचा पुरस्कार करण्यासाठींच कीं काय त्यानें एक सहा कलमांचें पत्रक काढून त्याची मान्यता सर्वास कबूल करावयास लाव- याचें ठरविलें. ह्या कलमास मान्यता दर्शविल्यास रोमन कॅथलीक पंथाचे आपण अनुयायी आहों हैं कबूल करण्यासारखेंच होई ! हेन्रीच्या या दुटप्पी वर्तनानें त्यास कोणाकडूनही सहानुभू मिळेना ! रोमन कॅथलीक लोकांस त्यानें सहा कलनांचें प्रसिद्ध केलेलें चोपडें जरी मान्य होतें तरी, धार्मिक बाबतींत पोपच्या ऐवजीं हेन्रीचें वर्चस्व अर्थातच त्यांना मान्य होण्यासारखें नव्हतें. इकडे प्रॉटेस्टंट पंथीय लोकांस त्याच्या सहा कलमांच्या पत्रकास मान्यता दर्शविणें म्हणजे रोमन कॅथलीक पंथाचाच स्वीकार करणें असें वाटत असल्यानें त्या पत्रकांस मान्यता न देण्याचे त्यांनी ठरविलें. हेन्रीच्या अमदानीत तत्कालीन लोकांच्या आकांक्षेप्रमाणें धार्मिक बाबींचा कायमचा असा कांहींच निकाल लागला नाहीं, तेव्हां हेन्रीनंतर येणाऱ्या राज्यकर्त्यांना या धार्मिक प्रश्नासंबंधानें आपापल्या मताप्रमाणें इंग्लंडचें धोरण ठरवावें लागलें. हेन्रीच्या अमदानीचा थोडक्यांत वृत्तांत सांगतांना त्यानें आपल्या हयातीत केलेल्या पांच लग्नसंबंधांबद्दल उल्लेख करणें जरूर आहे. त्यानें कॅथराईननंतर ॲन बोलीन हिच्याशी लग्न केलें होतें हे आपण पाहिलेंच आहे. हिच्यापासून त्याला इलिझाबेद नांवाची कन्या झाली; परंतु थोडक्याच दिवसांत त्याचें ॲन बोलीनशीं न पटून त्यानें तिचा वध करविला ( १५३६ ). त्यानंतर त्यानें जेन सेमूर नांवाच्या स्त्रीशी लग्न केलें, व या विवाहापासून त्या