पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें . ] ट्यूडर घराण्याच्या अमदानींतील इंग्लंड. ५९ परंतु कांहीं वर्षे लोटल्यावर जेव्हां त्यास कॅथराईन आवडेनाशी होऊन तिच्याशीं काडी मोडून द्यावी असें त्यास वाटूं लागलें, तेव्हांच ८ व्या हेन्रीनें या विवाहाच्या शास्त्रसंमतीबद्दल शंका प्रदर्शित केली. कॅथराईन- वरील हेन्रीचें प्रेम उडून जाण्यास कांहीं कारणें सांगतां येतील व तीं कारणें म्हणजे (१) कॅथराईन ही हेन्रीपेक्षां वयाने मोठी व तिचा स्वभाव हेन्रीप्रमाणे रंगेल व आनंदी नसून तो कांहींसा धार्मिक व उदास असल्या- मुळें ती त्यास आवडेनाशी झाली होती; (२) कॅथराईनपासून हेन्रीला पुत्र न होतां, मेरी नांवाची एक अशक्त मुलगीच झालेली होती; (३) स्पेन व इंग्लंड यांमध्यें सलोख्याचा संबंध घडवून आणावा म्हणूनच हा विवाह मुख्यत्वेंकरून घडवून आणलेला होता, परंतु १५२५ च्या सुमारास या दोन *राष्ट्रांमध्ये वितुष्ट आल्यामुळें, ज्या कारणासाठी हा विवाह घडवून आणला होता तें कारणही नष्ट झालें; व (४) या वरील सर्व कारणांखेरीज राज्ञी - कॅथराईन हिच्या तैनातीस असलेल्या ॲन बोलिन नांवाच्या सुंदर दासी- वर हेन्रीचें प्रेम जडलें होतें ! या व अशा प्रकारच्या कारणासाठीं आपल्या पत्नीशी काडी मोडण्याचा त्यानें विचार केला; व आपला हेतु साध्य करून घेण्यासाठीं आपल्या विवाहास पोपनें पूर्वी दिलेली परवानगी अगदींच अशास्त्र असल्याची सबब त्यानें पुढें मांडली. तेव्हां हा विवाह शास्त्रसंमत नसल्यामुळे तो रद्द समजण्याची पर- वानगी द्यावी अशी हेन्रीनें पोप ७ वा क्लेमंट याजकडे विनंति केली (१५२७), परंतु या वेळीं पोप फारच चमत्कारिक स्थितींत होता ! याच सुमारास पवित्र रोमन पादशाहीचा बादशहा पांचवा चार्लस यानें रोम शहर उध्वस्त करून पोपला तह करणें भाग पाडल्यामुळें, बादशहा चार्लसच्या घराण्यांतील कॅथराईन हिच्याशी काडी मोडण्याची ८ व्या हेन्रीला पर- वानगी देणें इष्ट वाटलें नाहीं, परंतु इकडे हेन्रीलाही साफ नाहीं म्हणतां येईना! अशा रीतीनें पोपची इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिति .झाल्यामुळे, आतां काय करावें हेंच त्यास सुचेना ! तेव्हां आतां कसें 4