पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण ८ व्या हेन्रीचें लग्न व त्याचे आपल्या पत्नीशी वितुष्ट. तेव्हां ८ व्या हेन्रीची पत्नी कॅथराईन हिच्या घटस्फोटासंबंधाची हकीकत नीट लक्षांत येण्यास आपणास सातव्या हेन्रीच्या धोरणाकडे लक्ष देणें अत्यावश्यक आहे. सातवा हेन्री हा महत्त्वाकांक्षी असल्यामुळे, युरो- पियन राजकारणांत हात घालून साधल्यास इंग्लंडचा फायदा करून यात्रा या हेतूनें त्यानें स्पेनशीं सख्य केलें होतें. आज बरीच वर्षे फ्रान्स व इंग्लंड यांमध्यें वैरभाव होता तेव्हां युरोपमधील एखाद्या राष्ट्राशीं स्नेहसंबंध असणें इष्ट आहे असें वाटून स्पेनशीं मैत्री राखण्याचे कामी इंग्लंडचे प्रयत्न सुरू होते. या वेळीं स्पेनलाही आपल्या फायद्यासाठी इंग्लंडशीं स्नेहसंबंध असणें जरूर असल्यामुळे, स्पेनचा राजा फर्डिनंड व इंग्लंडचा राजा ७ वा हेन्री यांच्यामध्ये सख्य होऊन हा स्नेहसंबंध अधिक निकट करण्याच्या उद्देशानें त्यांनी इंग्लिश राजपुत्र आर्थर व स्पॅनिश राजकन्या कॅथराईन यांचा विवाह घडवून आणला होता. परंतु राजकीय स्नेहसंबंध दृढ राखण्यासाठी घडवून आणलेलें लग्न होऊन कांहीं दिवस झाले नाहींत तोच इंग्लिश राजपुत्र आर्थर हा मरण पावला. तेव्हां या दोन्ही राष्ट्रांच्या स्नेहसंबंधांत कांहीं बिघाड येऊं नये म्हणून आर्थरचा धाकटा भाऊ हेन्री याचा विधवा झालेल्या कॅथराईन राजकन्येशी विवाह घडवून आणावा, असें ७ वा हेन्री व फर्डिनंड या दोघांसही वाटूं लागलें. परंतु अशा प्रकारचा विवाह घडवून येण्याच्या मार्गांत धार्मिक अडचण असल्या- मुळे पोपच्या संमतीखेरीज त्यांना हा विवाह घडवून आणतां येईना ! आपल्या मृत भावाच्या पत्नीशीं कोणीं लग्न करूं नये अशी ख्रिस्ती धर्माची आज्ञा होती, परंतु ७ वा हेन्री व फर्डिनंड यांना खूष करण्यासाठी २ - जुलीअस पोपनें आपल्या अधिकारानें हा विवाह घडवून आण- ण्यास परवानगी दिल्यावर राजपुत्र हेन्री व राजकन्या कॅथराईन यांचा १५०९ मध्ये विवाह झाला. ८ वा हेन्री गादीवर आल्यावर, हा विवाह शास्त्रसंमत आहे कीं नाहीं याविषयीं त्यानें कोणत्याच प्रकारची शंका प्रदर्शित केली नव्हती;