पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण तरी करून हें प्रकरण लांबणीवर टाकावें असें वाटून, त्यानें या बाबीसंबं- धानें इंग्लंडमध्येंच चौकशी झाली पाहिजे असें ठरवून, या चौकशीच्या कामावर इंग्लंडमधील वुलूसे व कँपेजो नांवाचा एक इटालियन यांची नेमणूक केली. पोपनें आपल्या काडी मोडण्याच्या प्रकरणांत कांहींच निकाल न देतां, हें प्रकरण लांबणीवर टाकण्याच्या इराद्यानें वरील व्यवस्था केली आहे, हें हेन्रीच्या लक्षांत येतांच त्यानें इटालियन गृहस्थाला इंग्लंड- मधून परत पाठवून दिलें व वुल्से यास आपल्या उच्च दर्जावरून बडतर्फ केलें; यानंतर कांहीं दिवसांनीं वुलसे मृत्यु पावला (१५३०). पोप आपल्या काडी मोडण्याच्या प्रकरणांत उगीच टाळाटाळ करीत आहे हें पहातांच पोपची इंग्लंडवर असलेली सत्ता झुगारून देऊन इंग्लंडचें चर्च रोमन चर्चपासून अलग करण्याचा त्यानें निश्चय केला. इंग्लंडचें चर्च स्वतंत्र झाल्यास इंग्लिश आर्चबिशपकडून आपण मोडण्यासंबंधीं परवानगी सहज मिळवितां येईल असें त्यास बाटत होतें. हेन्रीच्या असें मनांत आल्यावर त्याने कॅन्मर व थॉमस क्रॉमवेल या पुरुषांच्या सल्लथानें, धाकदपटशा दाखवून इंग्लंडमधील धर्माधिकाऱ्याचें मत आपल्या बाजूला वळवून घेतलें, व इंग्लंडच्या मुख्य आर्च- बिशपकडून आपल्या पहिल्या पत्नीशीं काडी मोडण्याची परवानगी मिळ- विली ( १५३३ ), व नंतर लागलीच ॲन बोलीनशी लग्न करून तिला राज्ञी केल्याचे जाहीर केलें. ८ वा हेन्री पोपची इंग्लंडवर असलेला सत्ता झुगारून देतो. यानंतर आपल्या सर्व कृत्यास कायदेशीर स्वरूप देण्यासाठीं हेन्रीनें पार्लमेंटची बैठक भरविली, व इंग्लंडचा राजा हाच धार्मिक बाब- तीतही मुख्याध्यक्ष असल्याचा कायदा पास करून घेतला ( १५३४ ). तेव्हां अर्थातच धार्मिक बाबीसंबंधाचे कज्जेदेखील पोपकडे नेण्याचा प्रघात कायद्यानें बंद करण्यांत आला ! हेन्रीच्या या कृत्यानें रोमन कॅथ- लीक धर्माच्या कट्ट्या अनुयायांस अर्थातच राग येऊन ते हेन्रीची धार्मिक बार्बासिंबंधांची सत्ता मान्य करण्याच्या बाबतींत टाळाटाळ करूं लागले.