पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें. ] ट्यूडर घराण्याच्या अमदानींतील इंग्लंड. ५७ करण्यास सांगितलें; परंतु फ्लॉडन फील्ड येथें स्कॉटिश सैन्याचा पूर्ण पराभव होऊन स्कॉटलंडचा राजा ४ था जेम्स हा लढाईत मारला गेला. आठव्या हेन्रीस सर्व बाबींत सल्लामसलत देणारा मुख्य प्रधान थॉमस बुल्से हा असून याच्याच सल्लामसलतीनें हेन्री कांहीं वर्षे राज्य- कारभार करीत होता. वुलसे याचा जन्म गरिबीच्या घराण्यांत झाला होता तरी तो आपल्या कर्तबगारीनें उच्चपदाप्रत चढत जाऊन त्यानें राजाची मर्जी संपादन केली होती. हेन्रीनें त्यास यॉर्कच्या आर्चबिशपची जागा दिली. यानंतर त्यास राज्यकारभाराचीं महत्त्वाचीं थॉमस बुल्से १४७१-१५३० कामें देण्यांत येऊन १५१५ मध्ये तर चान्सेलरची जागा देण्यांत आली. या वेळेपासून पुढें बुल्से याचें वजन वाढत जाऊन त्यास सर्व लोक राजाच्या खालोखाल मान देऊं लागले. १५१७ मध्ये जर्मनींत ल्यूथरनें पोपच्या कृतीविरुद्ध आपले ९५ मुद्दे प्रसिद्ध केल्यापासून सर्व युरोपभर धर्मसुधारणेची चळवळ सुरू झाली व इंग्लंडमधील लोकही या प्रश्नाचा विचार करूं लागले. इंग्लंडचा राजा ८ वा हेन्री यानेंही धार्मिक पुस्तकांचें अध्ययन केलें होतें, व ल्यूथरच्या म्हणण्याचा आपणही विचार करावा असें त्यास वाटूं लागलें. ल्यूथरनें प्रतिपादन केलेल्या तत्त्वांचा विचार करीत असतां, ल्यूथरनें पोपच्या सत्तेबद्दल आपली शंका व्यक्त केलेली पाहून हेन्रीला ल्यूथरचा राग आला व पोपच्या सत्तेची तरफदारी करण्यासाठीं त्यानें एक पत्रक प्रसिद्ध केलें ( १५२१ ); तेव्हां पोपनें संतुष्ट होऊन हेन्रीस ' धर्मसंरक्षक' असा किताब ८ व्या हेन्स — धर्मसंरक्षक ’ हा किताब मिळतो. बहाल केला. अशा रीतीनें हेन्री व पोप यांच्या- मध्यें सलोखा होता तरी आपल्या पत्नीच्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळें मात्र हेन्री व पोप यांच्यामध्यें वितुष्ट येऊन बिचाऱ्या वुल्सेवर हेन्रीची गैरमर्जी झाली व त्यास आपल्या अधिकारपदावरून च्युत व्हावें लागलें. r