पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण आणल्यामुळे, या शाळेत ग्रीक, लॅटीन भाषेसारखे कठीण विषयही शिकत असत. सेंटपॉलच्या शाळेतील विद्यार्थी मोठ्या आवडीने शिक्षणपद्धति पाहून त्या नमुन्याप्रमाणे शिक्षण देणाऱ्या इतर शाळाही तदनंतर अस्तित्वांत आल्या. सर थामस मूरचा 'युटोपिया' ग्रंथ. सर थॉमस मूर यानें राजकीय बाबतींत लक्ष घालून राजकीय 'विषयावर 'युटोपिया' नांवाचें पुस्तक लिहिलें. या पुस्तकांत त्यानें आपले राज- कीय विचार ग्रथित केले असून राजकीय सुधारणा करणाऱ्या मुत्सद्यांपुढें एक नमुनेदार राज्यपद्धति ठेवलेली होती. 'समता, स्वतंत्रता व न्याय' या ' पायावर मूरनें कल्पिलेल्या राज्याची उभारणी केलेली असून प्रत्येकानें तें ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करावा असें त्या ग्रंथांत प्रतिपादन केलेलें होतें. तेव्हां अशा प्रकारचें मूरचें पुस्तक वाचून तत्कालीन राज्यपद्धतींत काय काय उणीवा आहेत हें लोकांच्या तात्काळ निदर्शनास येई. अशाप्रकारची तत्कालीन परिस्थिति असून आठव्या हेन्रीचे विचार जरी उन्नत होते, तरी त्यानें आपल्या राज्यांत नवीन विचारक्रांती- प्रमाणें सामाजिक, धार्मिक व राजकीय बाबींत सुधारणा घडून आणण्या- संबंधानें कांहींच केलें नाहीं. त्याच्याकडून राष्ट्रांतील विद्वान मंडळीस जरी आश्रय मिळत होता, तरी त्यापासून राष्ट्रांतील बहुजनसमाजाचा कांहींच फायदा झाल्याचे दिसत नाहीं. १५१२ मध्यें हेन्रीनें परराष्ट्रीय राजकारणांत हात घालून, फ्रान्सचें इटलीमधील वर्चस्व कमी करण्यासाठीं स्पेनशीं तह केला; व फ्रान्सच्या किनाऱ्यावर असलेल्या आपल्या कॅले या ठिकाणाहून एक सैन्य रवाना करून १५१३ सालीं फ्रान्सचा पराभव केला. आपल्यावर इंग्लिश सैन्य येत आहे हें पाहून फ्रान्सनें स्कॉटलंडचा राजा फ्रान्स व स्कॉटलंड यांच्यावरोवर मकी- १५१३. चक- ४था जेम्स याचें मन वळवून त्यास उत्तरकेडून इंग्लंडवर स्वारी