पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ५ वें. ट्यूडर घराण्याच्या अमदानींतील इंग्लंड. ( आठवा हेन्री १५०९ ते १५४७ ) ईंग्लंडमधील अनियंत्रित_राजसत्तेचा उत्पादक सातवा हेन्री "याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र आठवा हेन्री इंग्लंडच्या गादीवर आला. हेन्रीची कलाकौशल्याच्या गोष्टींकडे प्रवृत्ति होती; व प्राचीन कलाविद्यांचें पुनरुज्जीवन करण्याचे काम आपण प्रोत्साहन द्यावें असें त्यास वाटत असल्यामुळें इंग्लिश जनतेंत त्याच्याबद्दल प्रेमभाव वाटून त्याच्या अमदानींत इंग्लंडची सामाजिक, औद्योगिक, धार्मिक बाबींमध्यें उन्नति होईल अशी प्रत्येकास आशा वाटूं लागली. या सुमारास सर्व युरोपभर नवीन विचारांच्या लाटा पसरत होत्या. युरोपांतील इतर राष्ट्रांप्रमाणें इंग्लंडमध्येही विचारक्रांति होऊन, प्राचीन कलाविद्यांचें अध्ययन करण्यांत विद्वान मंडळी निमग्न होती. ग्रीक व लॅटीन भाषांचें अध्ययन करून त्यांतील नानाविध पुस्तकांत सांठविलेल्या ज्ञानाचा फायदा आपल्या देशबांधवांस करून देण्याचा इंग्लिश विद्वान् विचार करूं लागले. इंग्लंडमध्यें जॉन कोलेट व सर थॉमस मूर या विद्वानांनी या कामी पुढाकार घेऊन ग्रीक व लॅटीन भाषेतील ग्रंथांत ग्रथित केलेले प्लेटो व ॲरिस्टॉटल यांचे उन्नत विचार आपल्या देश- बांधवांपुढे मांडले. कोलेटनें आपणाकडे शिक्षणाचें काम घेऊन, आपल्या स्वतःच्या खर्चानें सेंटपॉलची शाळा स्थापन केली, व तेथें कोलेटची कामगिरी. नवीन पद्धतीनें शिक्षण देण्यास सुरुवात केली.. मध्ययुगांतील विद्यार्थ्यास कंटाळवाण्या वाटणाऱ्या पद्धतीऐवजीं विद्यार्थ्यांचे मनोरंजन होऊन ज्ञानसंपादन करण्याकडे त्यांचें साहजिकच लक्ष . लागावें अशी नवीन शिक्षणपद्धति त्यानें अंमलांत