पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण ४ थे. ] सर्व राष्ट्रं आपापल्या राष्ट्रांची सामाजिक, धार्मिक व राजकीय बाबींत सुधारणा करण्यामध्यें निमग्न असतां, स्पेन राष्ट्रावर मात्र या लाटेचा कांहींच परिणाम झाला नाहीं ! दुसऱ्या फिलीपनंतर स्पेनच्या गादीवर येणारा तिसरा फिलीप ( १५९८ ते १६२१ ) राज्यकारभार पहाण्यास अगदीं असमर्थ होता. प्रॉटेस्टंट पंथीय डच लोकांनीं उभारलेल्या बंडाचा प्रतिकार करण्यासाठी दुसऱ्या फिलीपनें सुरू केलेली खटपट याच्या अमदानींत निष्फळ ठरून त्यास १६०९ मध्ये डच लोकांशी तह करणें भाग पडलें. आपल्या साम्राज्यांतून विभक्त झालेल्या डच लोकांशी तह कबूल करणें म्हणजे स्पेननें आपला व्हासच सार्वजनिकरीत्या कबूल करण्याप्रमाणें होय ! या- नंतर चवथ्या फिलीपच्या अमदानींत ( १६२१ ते १६६५ ) १६४८ मध्यें झालेला वेस्टफालियाचा तह, व त्याचप्रमाणें १६५९ मध्यें फ्रान्सशीं झालेला पिरनीजचा तह, या दोन तहांमुळे एकेकाळीं वैभवाच्या अत्युच्च शिखरावर पोहोंचलेल्या स्पॅनिश राष्ट्राचा पूर्णपणें -हास होऊन तें राष्ट्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रतीच्या युरोपियन राष्ट्रांच्या दर्जास जाऊन पोहोंचलें !