पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थें. ] स्पेनचा उत्कर्ष व महास. ५३ उपसण्याचें त्या चिमुकल्या राष्ट्रामध्यें सामर्थ्य नसल्यामुळे फिलीपचें जुलमी जूं आपल्या मानेवर घेणें त्यास भाग पडलें. परंतु पुनः योग्य संधि सांपडल्यास परकीय राजसत्तेचें जुलमी जूं फेंकून देण्याची आशा पोर्तुगालचें राज्य स्पेनच्या राज्यांत सामील करण्यांत येतें. पोर्तुगीज लोकांनी कांहीं सोडली नाहीं. पोर्तुगीज लोकांना परकीय राजसत्ता उलथून पाडण्यासाठीं फार दिवस वाट पहावी लागली नाहीं; कारण फिलीपचा मृत्यु होऊन चाळीस वर्षे लोटलीं नाहींत तोंच पोर्तुगीज लोकांच्या स्वराज्यप्राप्तीच्या प्रयत्नास यश येऊन त्यांनीं आपलें स्वातंत्र्य पुनरपि प्राप्त करून घेतलें. ( १६४० ). फिलीपनें लेपँटो येथें टर्क लोकांवर मिळविलेला जय, फिलीपच्या अमदानींत स्पेनचें विस्तृत पावणारें साम्राज्य, त्याचप्रमाणें प्रॉटेस्टंट- पंथीय राष्ट्रांशीं त्यानें केलेल्या लढाया या सर्व गोष्टींवरून स्पेनचें वैभव व उत्कर्ष सर्वत्र प्रसार पावत आहे असें वाटत असले, तरी या उत्कर्ष- साधनाच्या प्रयत्नांतच स्पेनच्या -हासाचें बीज पेरलेलें होतें असें दिसतें. कारण चार्लस व फिलीप यांच्या अमदानीत स्पेनमधील राजसत्ता अनियं- त्रित झाली असून, लोकांच्या मनांतील प्रागतिक व लोकनियंत्रित राज्यपद्धतीच्या कल्पना पार चेपून टाकण्यांत स्पेनचा -हास. आल्या होत्या. या अनियंत्रित राजसत्तेच्या जोडीला, स्पेनमध्ये आपला प्रभाव दाखविणाऱ्या धर्मकोर्टाकडून, स्पेनमधील महंमदी- धर्माच्या मूर लोकांस हांकून लावले असल्यामुळे, या लोकांबरोबरच शेतीसुधारणा, उद्योगधंदे व कलाकौशल्याच्या गोष्टीही स्पेनमधून नष्ट होऊन, स्पॅनिश राष्ट्राच्या उत्कर्षाची वाढच खुंटली होती असे म्हणण्या- स हरकत नाहीं. अनियंत्रित राजसत्ता व जुलमी धर्मकोर्ट यांच्या प्रभावानें स्पेनचें वरवर दिसणारें वैभव पोखरून टाकलें होतें. स्पेनमधील राज्य- कर्त्यांप्रमाणें तेथील जनताही धर्मवेडी व प्रतिगामी धोरणाची होती व यामुळे सर्व युरोपभर नवीन विचारांची व नवीन कल्पनांची लाट पसरून