पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण युरोपियन राष्ट्रांकडून रेखाटण्यांत योंव हें खरोखरीच आश्चर्य होय ! तेव्हां याचा सूक्ष्मदृष्टीनें विचार करण्यासाठी आपणास फिलीपच्या स्वभावाचें दुसऱ्या फिलीपच्या स्वभावाचें पृथक्करण. पृथक्करण केलें पाहिजे. फिलीपचा स्वभाव कडक असून त्याचे विचार कोते असत ! या जगावर ईश्वराचे आपण प्रतिनिधि आहांत अशी त्याची प्रामाणिक समजूत होती व आपल्या इछेच्या आड येण्याचा कोण प्रयत्न केल्यास त्याचा प्रतिकार करण्याचा तो तत्काळ प्रयत्न करी. रोमन कॅथलिक पंथाचा तो कट्टा अनुयायी असल्यामुळे, त्या धर्माविरुद्ध उत्पन्न झालेल्या चळवळीचा बीमोड करणें हें आपलें पवित्र कर्तव्य आहे अशी त्याची समजूत होती. फिलीपचे अशाप्रकारचे विचार असल्यामुळे उत्तरे- कडील प्रागतिक राष्ट्रांचा व त्याचा खटका उडून त्या राष्ट्रांकडून त्याचें असें कठोर चित्र रेखाटण्यांत आलें होतें असें म्हटलें पाहिजे. फिलीपचे वरील प्रकारचे विचार असल्यामुळें, रोमन कॅथलिक पंथाचा प्रसार करून प्रॉटेस्टंट पंथाचा विध्वंस करण्याकडे त्यानें प्रयत्न करावेत यांत कांहींच नवल नव्हते. परंतु त्यांच्या अमदानींत धार्मिक बाबीसंबंधानें जीं अनेक युद्धे झालीं त्यांस तो एकटाच जबाबदार होता असें नव्हे; तर प्रॉटेस्टंटपथीय राष्ट्रांकडूनही यांपैकीं कांहीं युद्धे त्याच्यावर लादलेली होतीं असें म्हणण्यास हरकत नाहीं. फिलीपच्या वेळेस युरोप- मध्यें या दोन्ही पक्षांमध्ये असलेला मतभेद तीव्रतर होऊन एकदां कायतो सोक्षमोक्ष करून घेण्यासाठीं जगडव्याळ धर्मयुद्ध उपस्थित होईलसा रंग दिसूं लागला. स्पॅनिश नेदर्लंडमध्यें धर्मयुद्ध सुरू होऊन त्याचे संकोचित क्षेत्र विस्तार पावलें व हलके हलके प्रॉटेस्टंट पंथीय प्रागतिक राष्ट्रांस या युद्धामध्ये भाग घ्यावा लागला. नेदर्लंडमधील या धर्मयुद्धास मदत करण्या- साठीं फ्रान्समधील ह्यूगेनॉटस, जर्मनीमधील प्रॉटेस्टंट पंथाचे अनुयायी व प्रॉटेस्टंट पंथीय इंग्लंड धांवून आल्यावर अर्थातच फिलिपला कॅथलीक - पंथीय राष्ट्रांची व लोकांची सहानुभूति मिळवावी लागून, पोपच्या सत्तेचे व रोमन कॅथलिक पंथाचे आपण रक्षणकर्ते आहोंत असें भासवावें लागलें.