पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ थें. ] स्पेनचा उत्कर्ष व हास. ५१ फिलीप हा गादीवर येतांच त्यास फ्रान्सचा राजा दुसरा हेन्री याच्याशी युद्ध ( १५५६ - १५५९ ) करावें लागलें. स्पेनच्या ताब्यांतील इटली व नेदर्लंडमधील प्रदेश हिरावून घेण्याचा प्रयत्न करावा असा दुसऱ्या हेन्रीचा विचार होता; परंतु या खेपेसही फ्रान्सचा प्रयत्न निष्फळ ठरून १५५९ मध्यें फ्रान्सला स्पेनशीं कॉटो-कॉन- स्पेनचें इटलीमधील ब्रेझी या ठिकाणी तह करणें भाग पडलें. या तहा- कांहीं संस्थानांवरील वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित होतें. मुळे पन्नास वर्षांपूर्वी या दोन राष्ट्रांमध्यें इटली- मधील नेपल्स व मीलन या दोन संस्थानांवरील वर्चस्वासंबंधानें सुरू झालेली चुरस नष्ट होऊन स्पेनचें या संस्थानांवरील वर्चस्व मात्र पूर्णपणे प्रस्थापित झालें. हें युद्ध • संपल्यानंतर नेदर्लंडमधील प्रॉटेस्टंट पंथाचा पूर्णपणें बीमोड करून टाक- ण्याच्या कामी प्रयत्न करण्यास अवसर सांपडला. या युद्धाचा वृत्तांत युढील एका प्रकरणीं सांगण्याचें योजल्यामुळें त्याचें येथें नुसतें दिग्दर्शन करणेच योग्य होय. नेदर्लंडमधील डच लोकांनीं स्वराज्यप्राप्तीसाठी उभारलेल्या बंडास मदत करून स्पेनचे वर्चस्व कमी करण्यासाठी नॅव्हेरीच्या हेन्रीच्या अमदानीं- तील फ्रान्स व इलिझाबेदच्या अमदानींतील इंग्लंड हीं राष्ट्रं धांवून आली तेव्हां मात्र फिलीपचें पित्त खवळलें; व प्रॉटेस्टंट पंथीय इंग्लंडचा - नायनाट करण्याचा त्यानें निश्चय केला. दुसरा फिलीप १५८८ मध्ये इंग्लंडचा पराभव करून त्या राष्ट्रास आपलें अंकित ·करून टाकण्यासाठीं फिलीपनें एक बलाढ्य आरमार तयार ठेवलें. तेव्हां या बलाढ्य व अजिंक्य समजल्या जाणाऱ्या आरमारापुढे इंग्लंडची धडगत न लागून त्याचा एका क्षणांत फडशा उडणार असें सर्वास वाटू लागलें ! परंतु इंग्लिश खलाशांच्या संघटित प्रयत्नानें व समुद्रावरील तुफानामुळें स्पॅनिश आरमाराची दुर्दशा झाली; व इंग्लंड.