पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ थें.] स्पेनचा उत्कर्ष व महास. ४९. दंगा करण्याचा घाट घातला, तेव्हां चार्लसने सैन्याच्या मदतीने कॅस्टाईल प्रांतांतील दंगा मोडून टाकून तेथील लोकांचे थोडे फार राजकीय हक्कही हिरावून घेतले. परंतु चार्लसचा स्पॅनिश लोकां- वरील जुलूम एवढ्यानेंच संपला असें नव्हे, तर फर्डिनंड व इझाबेला यांच्या अमदानींत जुलमी समजल्या जाणाऱ्या धर्मकोटीची पुनः स्थापना राजसत्तेचा लोकांचे हक्क हिरावून घेण्याकडे उपयोग. करण्यांत आली ! चार्लसनें आपल्या आयुष्यांतील बरीच वर्षे जर्मनीतच घालविली होतीं; शेवटीं तेथें चाललेल्या प्रॉटेस्टंट पंथीय चळवळीचा त्यास मोड करतां न आल्यामुळे त्यास १५५६ मध्ये जर्मनीमधून पळ काढावा लागला. स्पेनमध्ये आल्यावर त्यानें आपल्या बादशाही पदाचा व राजपदाचा त्याग करून, स्पेनचें राज्य व वसाहती आपला मुलगा फिलीप याच्या ताब्यांत दिल्या;व रोमन साम्राज्याचे बादशाही पद व ऑस्ट्रियाचें स्पेनचा राजा १२ रा फिलीप संस्थान त्याचा भाऊ फर्डिनंड याजकडे गेलें. आपल्या बापानंतर स्पेनच्या गादीवर येणारा २ रा फिलीप यास स्पेनचें राज्य व वसाहतीं त्याचप्रमाणें मीलन, नेपल्स व नेदर्लंड हेही प्रांत मिळाले होते. स्पेनचा राजा व रोमन बादशहा अशी दोन नातीं चार्लसच्या अमदानीत एकत्र झाल्यानें, स्पेनच्या राष्ट्रीय उत्कर्षास अडथळाच आला होता, परंतु २ रा फिलीप हा स्पेनचाच राजा असल्यानें त्यास स्पेनच्या उत्कर्षाकडे आपलें सर्व लक्ष देण्यास अवसर सांपडला. फिलीपनें आपल्या सर्व आमदानीत स्पेनचा उत्कर्ष करण्याकडेच लक्ष घातल्यामुळे त्याच्याबद्दल स्पॅनिश लोकांस अजूनही आदरभाव वाटत आहे. स्पॅनिश राष्ट्राकडून ज्या फिलीपला इतका मान मिळे व राष्ट्रीय योद्धा म्हणून ज्याचे गोडवे गाइले जात, त्याच फिलीपचें जुलमी राज- सत्तेचा संस्थापक व प्रतिगामी धोरणाचा प्रवर्तक असें हिडीस चित्र इतर