पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ४ थें. ++ स्पेनचा उत्कर्ष व महास. राष्ट्रीय दृष्ट्या विचार केला असतां, स्पेनचा राजा पहिला 'चार्लस (१५१६-१५५६ ) याची १५१९ मध्यें, रोमन साम्राज्याच्या पादशाही पदावर नेमणूक झाली हें स्पेनचें मोठें दुर्दैवच होय ! कारण चार्लसची १५१९मध्ये पवित्र रोमन साम्राज्याच्या बादशाही पदावर निवडणूक झाल्यावर त्यास रोमन साम्राज्यासंबंधी विचार करावा लागून स्पेनची राष्ट्रीय उन्नति करावयास फुरसत मिळत नव्हती.. आपली स्वतःची महत्त्वाकांक्षा व पादशाहीचें वर्चस्व सर्व युरोप- वर स्थापण्याच्या कामी त्यास स्पेनचें सैन्य व आरमार यांवरच मुख्यत्वें- करून अवलंबून रहावें लागून त्यानें मिळविलेल्या विजयामुळे रोमन साम्राज्याचें वर्चस्व वाढत गेलेलें दिसलें, तरी स्पेनच्या हितसंबंधाकडे त्याचें अगदींच दुर्लक्ष असल्यामुळें स्पेनची अंतःस्थिति फारच खालावत जाऊन त्यावेळेपासूनच स्पेनची उतरती कळा होण्यास प्रारंभ झाला असें म्हणावयास पाहिजे. पूर्वी फर्डिनंड व इझाबला यांच्या अमदानीत अमीर उमराव व सरदार लोक यांची सत्ता कमी करण्याकडेच अनियंत्रित राजसत्तेचा उपयोग होत असल्यानें अमीरउमरावांच्या बंडाळीपासून देशाची सुटका होऊन राष्ट्रांत शांतता व सुव्यवस्थितपणा स्थापन करण्याच्या कामी मदतच झाली; परंतु चार्लसनें आपल्या अमदानीत लोकांचे हक्क हिरावून घेण्याकडेच आपल्या राजसत्तेचा उपयोग करण्याचा प्रयत्न केल्यानें तर स्पॅनिश जनतेवर अरिष्टच ओढवलें ! कॅस्टाईल प्रांतांतील शहरांना कांहीं थोडे स्थानिक स्वराज्याचे हक्क देण्यांत आले होते, परंतु जेव्हां तेथील लोकांनीं चार्लसच्या या अरेरावी कृत्याचा १५२१ मध्ये निषेध करून