पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

3 . ] कॅथलिक पंथाकडून प्रॉटेस्टंट पंथास प्रतिकार. ४७ करून रोमन कॅथलिक पंथ भक्कम पायावर उभा करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करील अशी आशा वाटूं लागली. ट्रेंटच्या परिषदेप्रमाणेंच नास्तिक लोकांस शासन करण्यासाठीं स्थापन करण्यांत आलेल्या धर्मकोर्टाचाही, रोमन कॅथलिक पंथाचें अस्तित्व कायम टिकण्यास उपयोग झाला. प्रॉटेस्टंट लोक हे जणूं काय नास्तिकच आहेत असें समजून रोमन कॅथलिक धर्मपंथाच्या विरुद्ध आचरण केल्याच्या आरोपावरून त्यांना मालमत्तेची जप्ती किंवा फांशी या धर्मप्रसारार्थ स्थाप- लेलें कोर्ट . शिक्षा मिळू लागल्या. नास्तिक प्रकारचीं धर्मकोर्टें मध्ययुगा- लोकांचा निःपात करण्यासाठीं अशा .मध्ये युरोपमधील बहुतेक राष्ट्रांत आढळून येत; परंतु इटली, फ्रान्स, स्पेन व नेदर्लंड या राष्ट्रांखेरीज इतर देशांतून या कोर्टामुळें धर्माधिकाऱ्यांचें बरेंच प्रस्थ माजून क्वचित् प्रसंगीं राजसत्तेसही या कोर्टापुढें नमून वागावें लागेल अशा समजुतीनें हीं धर्मकोर्टें नाहींशीं करून टाकण्यांत आलीं होतीं. परंतु स्पेन, इटली व नेदर्लंड या देशांत या कोर्टाचें अस्तित्व पूर्वापार कायम असल्यानें या कोर्टामार्फत जुलमी उपायानें तेथील प्रॉटे- -स्टंट पंथीय चळवळ दडपून टाकण्याचा जोरानें प्रयत्न करण्यांत येई ! काहि