पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण सभासदास 'आपण पोपचा हुकूम पाळूं' अशी शपथ घ्यावयाची असल्यानें पोपच्या सत्तेस यांच्याकडून कांहीं विरोध होईल अशी भीति बाळगण्याचें कांहीं कारण नव्हतें. या पंथाच्या अनुयायांनीं रोमन कॅथलिक पंथाचा प्रसार करण्यासाठीं वाटल तीं अवघड व जोखमीचीं कामें करण्याच्या शपथा घेतल्या. युरोप- मधील प्रत्येक देशांत या पंथाच्या अनुयायांनीं आपल्या शाखा स्थापन केल्या. ठिकठिकाणी शाळा स्थापन करून, धर्माधिकाऱ्यांचा धंदा करून, मोठमोठ्या राजांच्या दरबारांत आपला प्रवेश जीजस्ट पंथाची कामगिरी. करून घेऊन त्यांना राजकीय बाबतींत सल्ला- मसलत देऊन, रोमन कॅथलिक पंथाचा प्रसार कर- ण्याच्या कामांत त्यांनीं यत्किंचितही खंड पडू दिला नाहीं ! जीजस्ट- पंथीय लोकांच्या या अविश्रांत परिश्रमानेंच रोमन कॅथलिक पंथाकडे ज्यांचा ओढा होता अशा इटली, स्पेन, फ्रान्स, पोलंड वगैरे देशांतून प्रॉटेस्टंट पंथाची हकालपट्टी झाली इतकेंच नव्हे तर ज्यांवर प्रॉटेस्टंट पंथाचा पूर्ण पगडा बसला होता अशा जर्मनी, इंग्लंड, स्वीडन, नॉर्वे वगैरे राष्ट्रां- मध्येही जीजस्ट पंथाच्या लोकांनीं आपला प्रभाव दाखविण्यास सुरुवात करून प्रॉटेस्टंट पंथ युरोपमधून नामशेष करण्याचा बेत आणला होता असें म्हणण्यास हरकत नाहीं ! जीजस्ट पंथाप्रमाणेंच ट्रेंट येथें वारंवार भरत असलेल्या धर्म- परिषदेनें ( १५४५ ते १५६३ ) रोमन कॅथलिक पंथांतील निरनिराळ्या तत्त्वांचें व आचरणांचें एकीकरण करून रोमन कॅथलिक पंथाची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. बायबलला असमंत ट्रेंटची परिषद. असलेल्या गोष्टी नाहींशा करून सुधारणा करण्याचा मुळींच प्रयत्न झाला नसल्याने या पंथामध्यें कितीतरी परस्परविरोधी अशा गोष्टी आढळून येत ! तेव्हां टेंट्र येथें भरणारी परिषद पोपच्या संमतीनें बायबलला संमत असलेल्या आचरणांचें एकीकरण