पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

3] कॅथलिक पंथाकडून प्रॉटेस्टंट पंथास प्रतिकार. ४५ अशा रीतीनें कॅथलिक पंथाचें पुनरुज्जीवन होत असतां, हें कार्य त्वरित घडून येण्यास आणखी कांहीं गोष्टींचं साहाय्य मिळालें. त्याचा थोडक्यांत उल्लेख करणें अवश्य आहे. या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे (१) जीजस्ट पंथ (२) ट्रेन्ट येथील परिषद (३) व धर्मकोर्ट याच होत. इग्नेश लोयोला. इग्नेशस लोयोला नांवाच्या एका स्पॅनिश सरदारानें जीजस्ट पंथ प्रस्थापित केला होता. इमेशस हा स्पेनच्या राजाच्या पदरीं लष्करी हुद्यावर असतां १५२१ मध्ये त्यास दुखापत झाली, व आजारी असतांना 'साधूंची चरित्रे ' हा ग्रंथ त्याच्या वाचण्यांत आला. या ग्रंथाचा त्याच्या मनावर अतोनात परिणाम होऊन आपण देखील पूर्वकालीन साधुसंतांप्रमाणें धर्म- प्रसारासाठीं आचरण करावें असें त्यास वाटूं लागलें; परंतु या बाबींत त्यानें केलेले पहिले प्रयत्न वेडेपणाचे व तात्त्विक असल्यामुळे त्यास यश आलें नाहीं. तेव्हां आपणास मिळालेलें शिक्षण पुरेसें नाहीं असें वाटून तें शिक्षण पुरें करण्यासाठीं त्यानें आपल्या वयाच्या ३६ व्या वर्षी लॅटीन भाषा, तत्त्वज्ञान व धर्मपुस्तकें यांचें अध्ययन करण्यास सुरुवात केली. हें शिक्षण घेण्यासाठीं तो पॅरिस शहरीं गेला असतां त्यास कांहीं अनुयायी मिळाले व त्यांनीं महमदी धर्मीय लोकांस ख्रिस्ती धर्माचा उपदेश करण्याच्या हेतूनें एक पंथ स्थापन केला. परंतु पूर्वेकडील महमदी धर्मीय राष्ट्रांत जाऊन ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याची त्यांना संधि सांपडली नाहीं, तेव्हां आतां रोमशहरी जाऊन पोपची आपल्या पंथाला मान्यता घेण्याचें त्यांनी ठरविलें. इग्नेशस लोयोला आपल्या पंथांतील कांहीं प्रमुख पुढा-यांसह रोम- शहरीं आल्यावर त्याच्या पंथास आपण मान्यता द्यावी किंवा नाहीं असा पोप ३ रा पॉल यास विचारच पडला, परंतु या पंथाकडून रोमन कॅथलिक पंथाचें वर्चस्व पुनरपि स्थापन करण्याचे कामीं बरीच मदत होईल असे वाटून जीजस्ट पंथ. पोपनें या पंथास आपली मान्यता दिली. या संस्थेतील - पंथांतील प्रत्येक