पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ युरोपचा अर्वाचीन इतिहास, [ प्रकरण प्रॉटेस्टंट पंथाचा अशारीतीनें युरोपमध्ये प्रसार होत असतां रोमन कॅथलिक पंथाच्या लोकांनाही आपल्या धर्मपंथांत कांहीं सुधारणा न केल्यास तो नामशेष होईल अशी भीति वाटू लागली. १३ व्या शतकापासूनच, , रोमन कॅथलिक पंथामध्यें सुधारणा करून ख्रिस्तीधर्मास असंमत असलेले आचार- विचार नाहींसे करण्याच्या सूचना येत असत. यानंतर सोळाव्या शतका- च्या प्रारंभी देखील इराझमस, रॉइचलिन, हूटन वगैरे विद्वान् लेखकांनीं व ल्यूथरनें देखील, रोमन कॅथलिक पंथामध्यें अवश्यक असलेल्या सुधारणा करून, धर्माधिकाऱ्यांचें व धर्मगुरूचें निंद्य व विलासी वर्तन बंद करावें अशा सूचना केलेल्या होत्या. परंतु यांच्या या योग्य सूचनांकडे ऐष- रोमन कॅथलिक पंथाची चळवळ. आरामांत व विलासांत दंग असलेल्या धर्मगुरूंनीं मुळींच लक्ष दिलें नाहीं. तेव्हां ल्यूथरला नाइलाजा- स्तव नवीन धर्मपंथाची स्थापना करावी लागली. ल्यूथरप्रमाणेच कॅल्व्हीन, स्विंगली वगैरे पुरुषांनीं प्रस्थापित केलेली धर्म- सुधारणेची लाट जसजशी सर्व युरोपभर पसरू लागली, तसतशी आपल्या धर्मपंथामध्यें अवश्यक असलेल्या सुधारणा केल्याखेरीज आपल्या धर्मपंथाची धडगत लागणार नाहीं असें रोमन कॅथलिक पंथाच्या अनुयायांस वाटूं लागलें. चवदाव्या व पंधराव्या शतकांतील पोप ऐषआरामांत व विलासांत दंग असून कलाकौशल्याच्या गोष्टींस प्रोत्साहन देण्यामध्यें मग्न असत, तेव्हां त्यांस चर्चच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याचें कोठून सुचणार ? परंतु १५५५ मध्ये ४था पॉल पोपच्या गादीवर आल्यावर, त्यास मात्र चर्चच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची अवश्य- कता वाटू लागली. पॉलनें स्वतः आपले वर्तन पवित्र व शुद्ध राखण्याचा निश्चय केला. त्याचें नेहमीं धार्मिक गोष्टींकडेच लक्ष असे. पॉलचें असें शुद्धा- पोप चवथा पॉल (१५५५-५९). चरण पाहून त्याच्या हाताखालील धर्माधिकाऱ्यांच्या आचारविचारांत क्रान्ति झाली व त्यांचें वर्तनही शुद्ध व पवित्र राहूं लागलें.