पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२. ] कॅथलिक पंथाकडून प्रॉटेस्टंट पंथास प्रतिकार. ४३ भारून जाऊन त्यांनीं त्यास त्या शहरांमध्ये आणखी कांहीं दिवस राहण्याचा आग्रह केला. त्यानें तेथें राहून जेनीव्हा शहरांतील लोकांवर आपलें पूर्ण वजन बसविलें इतकेंच नव्हे तर १५३६ पासून आपल्या मृत्यूपर्यंत (१५६४ पर्यंत ) तो त्या शहरांतील लोकांचा राजकीय व धार्मिक बाबींत मार्गदर्शकच होऊन बसला होता असे म्हणण्यास हरकत नाहीं ! कॅल्व्हीनचा प्राक्तनावर विश्वास असे. ईश्वरी इच्छेप्रमाणें सर्व गोष्टी होत असल्यामुळे आपल्या प्राक्तनांतच जर नसलें तर मुक्ति मिळविण्या- साठीं आपण खटपट केली तरी त्यांत यश येणें आपल्या हातचें नाहीं असें त्यास वाटे. चर्चच्या व्यवस्थेसंबंधीं त्याचे निराळे विचार असत. रोमन कॅथलिक पंथाप्रमाणें केवळ धर्मा- धिकारी वर्गाचाच चर्चच्या व्यवस्थेत हात असे. परंतु इतर सामान्य लोकांचाही चर्चसंबंधीं व्यवस्था ठरविण्याच्या का हात असावा असें कल्व्हीनला वाटे. रोमन कॅथलिक पंथाविरुद्ध ल्यूथरप्रमाणेंच याही धर्मपंथाचा प्रसार होऊं लागला. कॅल्व्हीनच धर्ममतें. कॅल्व्हीनें आपल्या पंथाचा प्रसार करण्याची खटपट जारीनें सुरू केली. जेनीव्हा शहर तर धर्मसुधारणेचें आगरच बनून राहिलें. इंग्लंड, फ्रान्स, स्कॉटलंड वगैरे देशांतील प्रॉटेस्टंटपंथीय लोक आपापल्या देशांतील धार्मिक जुलमास कंटाळून जेनीव्हा शहरांत येऊन राहत. या लोकांस त्या शहरांत आश्रय मिळाल्यावर हे कांहीं दिवसांनी आपापल्या देशांस जाऊन कल्व्हनिच्या धर्मपंथाचा प्रसार करण्याची जारीनें खटपट करीत, यामुळे कॅल्व्हीनच्या प्रसार सर्वत्र होऊन ल्यूथरच्या पंथापेक्षांही या पंथाचा पगडा सर्वत्र कॅल्व्हीनच्या पंथाचा प्रसार. बसूं लागला; व ल्यूथरपेक्षां हा पंथ अधिक जहाल असल्यामुळें रोमन कॅथलिक पंथातर्फे नुकत्याच सुरू झालेल्या चळवळीस तोंड देण्यास हा ल्यूथरच्या पंथापेक्षां अधिक खंबीर होता असें म्हणावयास पाहिजे ! पु /