पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण दोन प्रमुख शहरांतील व त्यांच्या आसपास असलेल्या प्रदेशांतील कांहीं लोकांनीं ह्या नवीन धर्मपंथाचा स्वीकार केला होता तरी इतर प्रदेशांतील लोक रोमन कॅथलिक पंथाचे कट्टे अनुयायी असल्यानें हा नवीन धर्मपंथ हाणून पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. १५३१ मध्ये या दोन पंथांत मोठें धर्मयुद्ध होऊन त्यांत स्विंगलीच्या पक्षाचा पराभव झाला व तो स्वित्झर्लंडमधील धर्मयुद्ध-- १५३१. लढाईत मरण मावला. परंतु हें युद्ध संपल्यावर झालेल्या तहामध्यें जर्मनींतील ऑग्जबर्ग येथील तहाच्याप्रमाणेंच व्यवस्था ठरविण्यांत आली. जर्मनी- प्रमाण येथेही लहान लहान लोकसत्ताक शहरांस आपला धर्मपंथ कोणता असावा हें ठरविण्याची परवानगी देण्यांत आली होती. यानंतर कांहीं वर्षांनीं स्वित्झर्लंडच्या फ्रान्सकडील सरहद्दीवरील. प्रदेशांत कॅल्व्हीन नांवाच्या पुरुषानें जेनीव्हा शहरांत एक धर्मपंथ स्थापून याचा प्रसार सर्वत्र केला. कॅल्व्हीन हा फ्रेंच असून त्याचा जन्म पिका येथें १५०७ मध्यें झाला. लहानपणापासूनच त्याच्या मनांत धर्मसुधारणेचे विचार घोळत असत. पुढें त्यानें आपल्या मताप्रमाणें लोकांस उपदेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यास फ्रान्स देश सोडावा लागला. त्यानंतर त्यानें कांहीं दिवस जर्मनी व स्वित्झर्लंड या देशांत धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यांत घालविले. १५३६ मध्ये त्यानें 'ख्रिश्चन धर्माचीं उदात्त तत्त्वें ' असा एक ग्रंथ प्रसिद्ध करून त्यामध्ये आपले धर्मसुधारणेचे विचार प्रगट केले. यानंतर परत आपल्या मातृभूमीकडे जात असतां त्यास वाटेंत एक रात्रभर जेनीव्हा शहरांत उतरावें लागलें. यावेळीं या लहानशा लोकसत्ताक शहरानें प्रॉटेस्टंट पंथाचा स्वीकार केला होता; परंतु आपल्या शहरांतील सामान्य जनतेस या धर्मपंथाचे महत्त्व समजून देण्यासाठीं त्या शहरांत कांहीं दिवस राहण्याची तेथील पुढारी मंडळींनी कॅल्व्हीनला विनंति केली. यावेळी कॅल्व्हीनच्या विद्वत्तेनें तेथील मंडळी जॉन कॅल्व्हीन १५०७ ते १५६४