पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ३ रें. कॅथलिक पंथाकडून प्रॉटेस्टंट पंथास प्रतिकार. जर्मनीमध्ये उद्भूत झालेली धर्मसुधारणेची लाट युरोपमधील 'उत्तरेकडील राष्ट्रांतून पसरू लागली इतकेंच नव्हे, तर दक्षिणे- कडील, पोपच्या अप्रत्यक्षपणे वर्चस्वाखालीं असलेल्या फ्रान्स, इटली व स्पेन या राष्ट्रांमध्येही त्या लाटेचा त्वरित प्रसार होऊं लागला ! उत्तरे- कडील डेन्मार्क, स्वीडन व नार्वे या तीन राष्ट्रांचें १३९७ पासून एकीकरण झालें होतें, परंतु सोळाव्या शतकाच्या प्रारंभी स्वीडननें डेन्मार्क- पासून विभक्त होऊन 'वॉसा' घराण्याच्या अमला- खालीं आपलें स्वातंत्र्य प्रस्थापित केलें होतें. स्वीडनमध्ये होणाऱ्या या राजकीय क्रान्तीस या धर्मसुधारणेच्या लाटेची मदतच झाली. उत्तरेकडील राष्ट्रांमध्यें ल्यूथरप्रमाणे धर्मसुधारणेचा उत्पादक कोणीच नव्हता, तेव्हां तेथें ल्यूथरच्या धर्मपंथाचाच प्रसार होण्यास अडचण पडली नाहीं. उत्तरेकडील राष्ट्रें ल्यूथरने स्थापलेल्या पंथाचीं अनुयायी होतात. परंतु स्वित्झर्लंडसारख्या चिमुकल्या राष्ट्राची स्थिति फारच निराळी होती. या राष्ट्रामध्यें ल्यूथरप्रमाणेच दुसरा एक धर्मसुधारक निर्माण झाला व त्यानें स्थापलेल्या धर्मपंथाचाच स्वित्झर्लंडवर पगडा बसला. १५१८ च्या सुमारास ल्यूथरप्रमाणेंच विंगली या पुरुषानें 'पातकापासून मुक्तता कर- स्वित्झर्लंडमधील धर्मसुधारणा. णाऱ्या पत्रका'वर कडक टीका केली. यानंतर स्वित्झर्लंडमधील इयुरीच या प्रसिद्ध शहरीं त्यानें एक नवीन धर्मपंथ स्थापन केला, व त्यास लागलीच बरेच अनुयायीही मिळाले. स्वित्झर्लंडमधील विंगली या पुरुषास आपल्या धर्मपंथाचा प्रसार करण्याच्या मार्गांत अडथळे आले नव्हते असें नाहीं; इयुरीच व बर्नस् या 3