पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० युरोपचा अर्वाचीन इतिहास [ प्रकरण २रें. ]. पाहिजे असें ठरविण्यांत आलें. परंतु या व्यवस्थेमुळे प्रॉटेस्टंट पंथीय 'लोकांस धर्माधिकाऱ्याच्या जागा न मिळाल्याचें जणूं काय कायद्यानेंच ठरल्यासारखें झालें. व प्राटेस्टंटपंथीय लोकांवर होणारा हा अन्याय दूर करण्यासाठींच पुढें साठ वर्षांनीं जर्मनीमध्यें दुसरें एक मोठें धर्मयुद्ध सुरू होऊन तें तीस वर्षे टिकलें. पांचवा चार्लस बादशाही पदाचा त्याग करतो - १५५६. पांचव्या चार्लसनें जर्मनीमधून पळ काढल्यावर तो स्पेनमध्यें गेला, व तेथें त्यानें आपण बादशाही पद सोडल्याचें जाहीर केलें ( १५५६ ).. यानंतर दोन वर्षांनीं तो स्पेनमधील एका धर्ममठांत मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अमला- खालीं असलेल्या विस्तृत प्रदेशाचे विभाग झाले. स्पेनचें राज्य व वसाहती, त्याचप्रमाणें इटली- मधील नेपल्स व मिलन हे प्रांत व नेदरलंड हा सर्व मुलूख त्याचा मुलगा फिलीप यास मिळाला व त्याचा भाऊ फर्डिनंड यास मात्र पवित्र रोमन साम्राज्याचें पादशाही पद व ऑस्ट्रियाचें संस्थान व ऑस्ट्रियाच्या प्रत्यक्ष अमलाखालीं असलेले प्रांत एवढा मुलूख मिळाला.