पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२. ] जर्मनीमधील धर्मसुधारणेची चळवळ. ३९ पहातांच मॅरीसनें एकदम चार्लसचा पक्ष सोडून प्रॉटेस्टंट पक्षाचा स्वीकार केला. अशा रीतीनें चार्लसचा पक्ष बराच कमजोर झाला. तेव्हां युद्ध- करून आपणाला धार्मिक प्रश्नाचा समाधानकारक निकाल लावतां याव- याचा नाहीं असें वाटून पुनः एकदां मोटी धर्मपरिषद भरवावी असें वाटूं लागलें. परंतु या वेळीं चार्लसविषयीं सर्वोचंच मत कलुषित अस- ल्यानें धर्मपरिषद भरविण्याची सूचना मूर्तस्वरूपांत आली नाहीं इतकेंच नव्हे तर गेल्या युद्धांत चार्लसनें जर्मनीमधील प्रॉटेस्टंट पंथीय संस्थानिका- शीं लढण्यासाठीं परकीय स्पॅनिश सैन्याची मदत घेतल्यामुळे त्याच्या विरुद्ध जर्मन लोकमत फारच खवळलें ! आतां मात्र जर्मनींतील या खळवलेल्या लोकमतास तोंड देणें अशक्य वाटून त्यानें जर्मनींतून स्पेनकडे पळ काढला. इकडे त्याचा भाऊ फर्डिनंड यानें प्रॉटेस्टंटपक्षीय संस्था- निकांशीं पॉस येथें तह केला; व लागलीच आग्जबर्ग येथे एक मोठी धर्मपरिषद भरवून धार्मिक प्रश्नांचा निःपक्षपातपणे विचार करण्याच अभिवचन दिलें. चार्लस स्पेनमध्ये पळून जातो. आग्जबर्ग येथील धर्मपरिषदेत प्राटेस्टंटपंथाचें अस्तित्व कायद्यानें मान्य करण्यांत येऊन जर्मनीमधील निरनिराळ्या संस्थानिकांना आपल्या संस्थानांत कोणता धर्मपंथ असावा हें ठरविण्याची परवानगी देण्यांत आली. तेव्हां या व्यवस्थेनें सामान्य जनतेस आपल्या संस्थानिकाप्रमाणेंच / कोणत्या तरी एका धर्माचें अनुयायी व्हावें लागत असून त्यांना धार्मिक बाबतींत मुळींच व्यक्तिस्वातंत्र्य नव्हतें. यानंतर जर्मनींतील निरनिराळ्या ठिकाणच्या धर्ममठांसंबंधी व्यवस्था ठरविण्यांत आग्जवर्ग येथील आली. एखाद्या धर्ममठांतील धर्माधिकाऱ्यास आपला रोमन कॅथलीक पंथ सोडावयाचा असला तर त्यास या बाबतींत परवानगी दिली असून, धर्मपरिषदेत ठरलेली व्यवस्था - १५५५. असें करतांना त्यानें धर्ममठांवरील अधिकाराचा मात्र राजीनामा दिला F