पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ आग्जवर्गची धर्म- परिषद - १५३०. युरापचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण चळवळ मोडून टाकण्याच्या कामी त्यास कितपत यश येतें याची शंकाच होती ! इटलीमधील मोहिमेवरून परत आल्यावर धर्मसुधारणेच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठीं एक मोठी धर्मपरिषद् आग्जबर्ग येथे भरविण्याचें त्यानें ठरविलें. या परिषदेमध्यें रोमन कॅथलीक व प्रॉटेस्टंट या दोन्ही पंथांतील प्रमुख पुढा-यांस निमंत्रण असून तेथें होणाऱ्या वादविवादाचा आपण निःपक्षपातपणें विचार करून काय तो निकाल देऊ असें त्यानें जाहीर केलें. या परिषदेमध्यें ल्यूथरच्या पक्षांतील प्रमुख मंडळींनीं एक मसुदा तयार करून त्यामध्यें आपल्या पंथाच्या समर्थनार्थ असलेले सर्व मुद्दे ग्रथित केलेले होते. अशा प्रकारें आग्जबर्ग येथें भरलेल्या परिषदेमध्यें 'धार्मिक बाबतींत वादविवाद चालला असतां चार्लसनें या धार्मिक प्रश्नाचा निःपक्षपातानें विचार न करितां, रोमन कॅथलीक पंथाचेच अनुयायी अधिक होते म्हणून रोमन कॅथलीक पंथाच्या लोकांचाच कड घेतली; व वर्म्स शहरीं प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाणें एक पत्रक काढून ल्यूथरला व त्याच्या अनुयायांस शिक्षा मिळावी असें फर्माविलें. आतां मात्र ल्यूथरच्या अनुयायांस त्वेष आला. बादशहाच्या हुकमाचा हरप्रकारें प्रतिकार करणें हेंच आपले कर्तव्य आहे असें त्यांनी ठरांवेलें ( १५३१ ). अशारीतीनें धार्मिक बाबतींतील दुफळीचें पर्यवसान आपसांतील युद्धांत होतें असें वाटूं लागलें; परंतु चार्लसला यावेळीं दुसरीकडे लक्ष पुरवावें लागल्यानें त्यानें आग्जबर्ग येथें ल्यूथरच्या अनुयायांविरुद्ध प्रसिद्ध केलेल्या पत्रकाची अंमलबजावणी करण्याचें मनांत आणलें नाहीं. यावेळीं आटोमन टर्क लोकांची सत्ता पूर्वयुरोपमध्यें पूर्णपणे प्रस्थापित झाली असून डॅन्यूब नदी ओलांडून ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना राजधानीवर हल्ला करावा असा त्यांचा विचार होता. तेव्हां टर्क लोकांची वृद्धिंगत होणारी सत्ता थोपवून