पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२. ] जर्मनीमधील धर्मसुधारणेची चळवळ. पांचवा चार्लस व आटोमन टर्क्स. ३७ धरण्यासाठीं जर्मनीमधील प्रॉटेस्टंट पंथीय लोकांचें आपणास पाठबळ. मिळविणें चार्लसला अत्यावश्यक बाटूं लागलें. प्रॉटेस्टंटपंथाविरुद्ध काढलेले सर्व हुकूम परत घेण्याचें चार्लसनें अभिवचन दिल्यावर त्यास प्रॉटेस्टंट- पंथांतील लोकांकडून टर्कीशीं लढण्यास मदत मिळाली. ( १५३२ ). चार्लस व आटोमन टर्क्स यांच्यामध्यें युद्ध सुरू होऊन त्यांत टर्कीचा पराभव झाला. यानंतर भूमध्यसमुद्रामध्यें चांचेपणा करून इटली व स्पेन या राष्ट्रांच्या किनाऱ्यावर लूटमार करणाऱ्या महमदीधर्मीय मूर लोकांकडे चार्लसला लक्ष घालावें लागलें. या चांचेलोकांचा पूर्ण बंदोबस्त. झाला नाहीं तोंच फ्रान्सच्या १ ल्या फॅन्सीसनें चार्लसविरुद्ध शस्त्र उपसलें. असल्यामुळें चार्लसला तिकडे आपले लक्ष द्यावें लागलें. अशा रीतीनें एका-- मागून एक परकीय शत्रूंचा बंदोबस्त करण्याकडे, चार्लसला आपलें सर्व लक्ष पुरवावें लागलें; व जर्मनीमधील धर्मसुधारणेची चळवळ दपटून टाक-- ण्यास त्यास अवसरच मिळाला नाहीं ! १५४५ च्या सुमारास फ्रान्सचा राजा १ ला फॅन्सीस याचा पूर्ण पराभव केल्यावर त्यास जर्मनीमधील धर्मसुधारणेच्या चळवळीकडे लक्ष देतां. आलें. यावेळीं पोपचें व चार्लसचें सख्य असल्यामुळे ट्रेन्ट येथें पोपच्याः संमतीनें ख्रिस्तीधर्माचा विचार करण्यासाठी एक मोठी परिषद भरविण्याचें ठरलें. या परिषदेसाठी रोमन कॅथलीक व प्रॉटेस्टंट. या दोन्ही पंथांतील लोकांनीं आपापले प्रतिनिधी पाठवावयाचे असून या ठिकाणी झालेला निर्णय सर्वांनी मान्य करावयाचा होता. परंतु या नवीन भरणाऱ्या परिषदेमध्यें सर्व गोष्टींचा निःपक्ष-- पातपणे निर्णय होईल असें गेल्या दोन परिषदांच्या ट्रेन्ट येथील धर्मपरिषद. अनुभवावरून प्रॉटेस्टंटपंथीय लोकांस वाटत नसल्यानें या परिषदेसाठीं प्रतिनिधी पाठविण्याचें त्यांनीं साफ नाकारलें ! तेव्हां या प्रश्नाचा तडजोडीनें काय तो निकाल लावणें अगदीं अशक्य आहे हे युद्ध केल्याखेरीज गत्यंतर नाहीं हें चार्लसला आढळून आलें. पाहून आतां इकडे प्रॉटे--