पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६. ] जर्मनीमधील धर्मसुधारणेची चळवळ. ३५ समाच कमकुवत असल्यानें हैं बंड मोडण्याचे काम जर्मनीमधील संस्था- निकांवर पडून पुष्कळ रक्तपात करून त्यांना हे बंड मोडावें लागलें. जर्मनीमध्ये अशाप्रकारची बंडाळी सुरू होती तरी पांचवा चार्लस इटलीवरील वर्चस्वासंबंधानें फान्सशी युद्ध करण्यांत गुंतला असून त्यास पाचव्या चार्लसचे जर्मनीकडे लक्ष देण्यास अवसरच सांपडला नाहीं ! १५२५ मध्यें पेव्हिया ठिकाणी चार्लसने फ्रान्सचा राजा १ ला फॅन्सीस याचा पूर्ण पराभव करून पहिल्या फॅन्सीस- बरोबर युद्ध. त्यास दांतीं तृण घेऊन शरण यावयास लावलें, व चार्लसने सुचविलेल्या तहाच्या सर्व अटी त्यास निमूटपणें कबूल कराव्या लागल्या. परंतु या तहास फॅन्सीसनें नाइलाजास्तवच संमति दिली होती. व चार्लसच्या तावडीतून सुटतांक्षणी पेव्हियाच्या लढाईचें उट्टे काढण्याचा त्यानें निश्चय केला. फॅन्सीसनें या सुमारास इंग्लंडचा राजा ८ वा हेन्दी यास आपल्या बाजूला वळवून घेतलें होतें. परंतु पांचव्या चार्लसने मुळींच न डगमगतां फॅन्सीसला तोंड देण्याचा निश्चय केला. १५२७ मध्ये चार्लसनें आपल्या सैन्यानिशी रोम शहराचा पाडाव करून फॅन्सीस व पोप यांना तह करणें भाग पाडलें. ( १५२९ ). या कॅबेच्या तहानें फॅन्सीसनें मीलन अरटॉस आणि लँडर्स हे प्रांत चार्लसच्या हवाली केले व पोपनें १५३० मध्ये चार्लसला बोलाँग या ठिकाणीं बादशहा म्हणून मिलन संस्थान चार्लसच्या ताब्यांत येतें-१५२९. राज्याभिषेक केला. अशा रीतीनें इटलीमधील कांहीं संस्थानांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यावर चार्लसला जर्मनीमधील धर्मसुधारणेच्या चळवळीकडे आपले लक्ष पुरवितां आलें. परंतु गेल्या दहा वर्षांत जर्मनीमध्ये धर्मसुधारणेच्या चळवळीची पाळेमुळे खोलवर गेलीं होती व एवढया अवधीत या चळवळीकडे त्याचें दुर्लक्ष असल्यामुळे ही