पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७० ( २ ) जात, करावयाची. परिशिष्ट. धर्म व एकराष्ट्रीयत्व या तत्त्वांवर राष्ट्रांची उभारणी या धोरणाप्रमाणें १७९५ मध्ये नामशेष झालेल्या 'पोलंड' राष्ट्राचं पुनरुज्जीवन करण्याचें ठरविण्यांत आलें. तसेंच फिनलंड व स्लोव्हाकिया हीं राष्ट्रं स्वतंत्र करण्यांत येऊन या राष्ट्रांतून समुद्राकडे जाणाऱ्या सर्व नद्या खुल्या करण्यांत आल्या. तसेंच जर्मनी व टर्की यांच्याकडून जिंकून घेतलेल्या प्रदेशांत तेथील लोकांच्या मनीषेप्रमाणे राज्यघटना ठरवावयाची असें निश्चित करण्यांत आलें. ( ३ ) यानंतर राष्ट्रांराष्ट्रांत कलह होऊं नयेत व युद्धाखेरीज इतर मार्गांनीं अंतर्राष्ट्रीय संबंध सोडविण्यांत यावेत या हेतूनें 'राष्ट्रसंघ' स्थापण्याचें ठरलें. या राष्ट्रसंघातर्फे राजकीय बाबीप्रमाणें आर्थिक बाबी- संबंधाचेही प्रश्न सोडविण्यांत यावेत असें वाटून ठिकठिकाणचे मजूर व कच्चा माल यासंबंधाचीही व्यवस्था एकमेकांच्या विचारानें होण्या चें निश्चित केलें. अशा प्रकारें या दोस्त राष्ट्रांच्या परिषदेनें पुढील धोरण आंखून जर्मनीशीं कोणत्या अटींवर तह करावयाचा हे ठरविलें; व ता. २८ जून १९१९ रोजी या तहास जर्मनीची संमति मिळाली. या महायुद्धामुळे इतर युरोपियन राष्ट्रांच्या अंतस्थ घटनेंत महत्त्वाचे फेरबदल झालेले आहेत, व होत आहेत; त्यामुळे सध्यां तरी त्यासंबंधानें निश्चित असें कांहींच सांगतां येणें शक्य नाहीं ! आस्ट्रियांत लोकसत्ताक राज्यपद्धति प्रस्थापित झाली आहे. आज पांच शतकें आस्ट्रियाशीं निग- ङित असलेल्या हंगेरीनें आस्ट्रियापासून विभक्त होऊन आपलें स्वातंत्र्य जाहीर केलें आहे. जर्मनीच्या राजकारणांत काय होईल हैं कांहींच सांगतां येत नाहीं, पण तेथें जबाबदार राज्यपद्धति स्थापन होऊन, कैसर वुई-