पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट. ३६९ सुरू केली. परंतु जर्मनीच्या या मोहिमेमुळे तटस्थ राष्ट्रांच्या व्यापारास धोका पोहचं लागल्यानें त्यांच्याकडून जर्मनीकडे तक्रारी जाऊं लागल्या. परंतु जर्मनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळें ता. २ एप्रिल १९१७ रोजीं अमेरिकेनें ( युनायटेड स्टेटस् ) दोस्त राष्ट्रांस मिळण्याचें ठरविलें. यानंतर दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रें व चीन यांनींही जर्मनीविरुद्ध आपले धोरण जाहीर केलें. याच सुमारास (फेब्रुवारी- एप्रिल १९१७) रशियामध्ये राज्यक्रान्ति होऊन युरोप व आशिया या प्रदेशावर पसरलेला रशियन साम्राज्याचा भक्कम वाटणारा डोलारा ढासळून पडून रशियामध्यें सर्वत्र बेबंदशाही माजली ! राजकीय बाबीप्रमाणेंच सामाजिक, आर्थिक वगैरे बाबींमध्येही रशियामधील खालच्या वर्गास आज ५-६ शतकें पायाखालीं दडपून ठेव- ण्यांत आलें असल्यामुळे, या राज्यक्रान्तीचा फायदा घेऊन रशियामध्यें बोल्शेविझमची चळवळ सुरू होऊन फ्रान्समधील राज्यक्रान्तीपेक्षां अनन्वित प्रकार होऊं लागले ( १९१८ ). अशा प्रकारें राशयामध्यें अंतस्थ खळबळ सुरू असल्यामुळें राश- याकडून आपणावर हल्ला येण्याचा संभव नाहीं असें वाटून जर्मनीला फ्रान्स, इंग्लंड व अमेरिका यांच्या संयक्त सैन्याशीं टक्कर देण्यासाठीं पश्चिम सरहद्दीवर आपल्या फौजा तात्काळ नेतां आल्या (मार्च १९१८). परंतु या कामीं जर्मनीस यश न मिळून जर्मन सैन्याचा पराभव झाला ११ नोव्हेंबर रोजीं दोस्त राष्ट्रांशी तह करण्यास संमति द्यावी लागली. यानंतर शत्रुराष्ट्रांशीं कोणत्या अटींवर तह करावयाचा हे ठरवि ण्यासाठीं दोस्त राष्ट्रांची एक परिषद भरली. या परिषदेस मुख्यत्वेंकरून तीन गोष्टी करावयाच्या होत्याः ( १ ) अंतर्राष्ट्रीय कायद्यांचा व ठरलेल्या करारनाम्यांचा उपमर्द करून हें युद्ध घडवून आणण्यांत जे जबाबदार असतील त्यांस शासन करावयाचें.