पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट. ३७१. ल्यमचें होहेनझोलार्न घराणें जरी पुनः राज्यारूढ झालें तरी राजसत्ता बरीच कमी होऊन लोकांच्या तंत्रानें राजास राज्यकारभार हांकावा लागेल ! रशियामध्यें तर सर्वत्र गोंधळ व बेबंदशाही माजली असून बराच विस्तृत प्रदेश रशियामध्ये मोडत असल्यानें तेथे यानंतर निरनिराळीं अनेक लोकनियंत्रित राज्य स्थापन होतील असा अजमास आहे. टर्कीसंबंधाचा प्रश्न बराच महत्त्वाचा असून त्यासंबंधानें टर्कीस तहाच्या कोणत्या अटी घालाव्यात याबद्दल दोस्त राष्ट्रांचा विचार सुरू आहे.