पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट. ता. २८ जून १९१९ रोजीं व्हर्सेल्स येथें तह होऊन पांच वर्षां- पूर्वी सुरू झालेलें महायुद्ध एकदाचें संपलें ! हें महायुद्ध सुरू असतां व तें संपून झालेल्या तहानें युरोपच्या राजकीय घटनेंत महत्त्वाचे फेरबदल होत आहेत; तेव्हां त्यांचें थोडक्यांत दिग्दर्शन केल्याखेरीज युरोपचा अर्वाचीन इतिहास अर्थातच पूर्ण व्हावयाचा नाहीं. ता. २८ जून रोजीं आस्ट्रियाचा राजपुत्र फँझ फर्डिनंड याच्या बॉस्निओ प्रांतांत झालेल्या खुनाचें निमित्त कारण होऊन ता. २८ जुलै रोजीं आस्ट्रियानें सर्व्हियाविरुद्ध लढाई पुकारली ! यानंतर आस्ट्रियास मदत करण्यास जर्मनी (१ आगस्ट), सर्व्हियाच्या बाजूनें रशिया (३१ जुलै) फ्रान्स (२ आगस्ट ) व ब्रिटिश साम्राज्य ( ४ आगस्ट) हीं राष्ट्रें या युद्धांत पडलीं. युद्धाचीं पहिलीं दोन अडीच वर्षे जर्मनीच्या नेतृत्वाखालीं असलेला संघ, आणि फ्रान्स, रशिया व इंग्लंड यांचा संघ एकमेकांशी झगडत होता. या वेळीं युरोप व युरोपच्या बाहेरील इतर प्रमुख राष्ट्रें तटस्थच होतीं. मध्यं- तरी १९१५च्या शेवटीं जर्मनीनें आपल्या पूर्वसरहद्दीवरील राशयन सैन्याचा पराभव करून टर्कीकडे जाणारा मार्ग मोकळा केला होता; परंतु आपल्यां पश्चिम सरहद्दीवर फ्रेंच व ब्रिटिश फौजांचा पराभव करण्याचे कामीं जर्मनीस यश आलें नाहीं. यावेळीं ( १९१६ ) दोस्त राष्ट्रांनाही जर्मनीच्या पुढें येणाऱ्या अवाढव्य सैन्यास थोपवून धरण्यापलीकडे कांहीं करतां आलें नाहीं. यानंतर १९१७ च्या जानेवारींत जर्मनीनें आपला ' सब्मराईन ' बोटींचा काफिला जय्यत असल्यामुळे, त्याच्या सहाय्यानें दोस्त राष्ट्रांचा व्यापारविषयक कोंडमारा करतां येईल असें वाटून ' सब्मराईन ' मोहीम