पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ वें. ] गेल्या चाळीस वर्षांतील युरोपियन राजकारण. ३६७ लवकरच मोठा युद्धप्रसंग होण्याचा संभव आहे असें वाटून प्रत्येक राष्ट्र आपापलें लष्करी व आरमारी सामर्थ्य वाढविण्याची आपणाकडून पराकाष्ठा करीत होतें. १९११ पासून जर्मनीनें दरवर्षी दीड कोटी रुपयांनीं आरमारावरील आपला खर्च वाढविला असून, आपलें आरमार जय्यत तयार राखण्याची खटपट केली; फ्रान्स व रशिया या राष्ट्रांनीं सैन्याची लष्करी नोकरीची मुदत वाढविली ! अशा प्रकारें प्रत्येक राष्ट्रा- कडून लष्कर व आरमार जय्यत राखण्यासाठी बेसुमार खर्च होऊं लागल्यानें प्रत्येक राष्ट्र लष्करी खर्चाच्या ओझ्याखालीं वांकून गेलें ! तेव्हां आतां एखादें क्षुल्लक कारण सांपडतांच युरोपियन राष्ट्रें एकमेकांवर तुटून पडणार असें वाटूं लागलें. ता. २८ जून १९१४ रोजीं आस्ट्रियाचा राजपुत्र फॅन्झ फर्डिनंड याचा आस्ट्रियन साम्राज्यांतील बोस्निओ प्रांतांत कांहीं कटवाल्या मंडळींच्या प्रेरणेनें खून होऊन या खुनाचा उगम सर्व्हिया- मध्यें आहे असें आढळून येऊन सर्व्हिया व आस्ट्रिया यांच्यामध्यें कलह उपस्थित झाला; व या कलहांत इतर बलाढ्य राष्ट्रें सामील झाल्यामुळे महायुद्ध सुरू होऊन त्याच्या ज्वाळा जगभर पसरूं लागल्या !