पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण साम्राज्यांत सर्वत्र खळबळ उडून बाल्कन द्वीपकल्पांतील बारकीं राष्ट्रें टर्कीविरुद्ध शस्त्र उपसण्यास सज्ज असतां, ग्रीसमध्यें व्हेनिझुलास नांवाचा एक पुरुष उदयास येऊन, त्यानें तेथील अंतस्थ व्यवस्था नीट लावल्यावर टर्कीच्या विरुद्ध बाल्कन राष्ट्रांचा एक संघ स्थापन केला ! अशाप्रकारें टर्कीवर या संघानें शस्त्र उपसल्यामुळें तें राष्ट्र १९१२ च्या सुमारास तह करण्यास कबूल झालें. परंतु हा तह झाला नाहीं तोंच या संघांतील राष्ट्र युद्धांत मिळालेला प्रदेश कसा वांटून घ्यावयाचा याबद्दल आपसांत भां लागली. बल्गेरियानें ग्रीस व सर्व्हिया या राष्ट्रांवर हल्ला केला, ही संधि पाहून रुमानियानें बल्गेरियावर हल्ला केला; सरतेशेवटीं बुखारेस्ट येथें तह होऊन आपसांतील युद्ध थांबविण्यांत आलें. या तहानें सर्व्हिया, ग्रीस, माँटे- निग्रो, रूमानिया या राष्ट्रांना अधिक प्रदेश मिळाला खरा, परंतु बल्गे- रियाला मात्र आपल्या बऱ्याच प्रदेशास मुकावें लागलें. अशाप्रकारें या युद्धानें बाल्कन द्वीपकल्पासंबंधानें कायमची अशी कांहींच व्यवस्था न लागतां तेथील राष्ट्रें एकमेकांविषयीं साशंकच राहूं लागलीं ! बाल्कन द्वीपकल्पांतील चळवळीचा इतर प्रमुख युरोपियन राष्ट्रां- वर परिणाम झाला. जर्मनीनें आपल्या कांहीं अंतस्थ हेतूंसाठीं टर्कीस उचलून धरून टर्कीची आपणाकडे सहानभूति मिळविण्याचा प्रयत्न चाल- विला असल्यामुळे टर्कीचा पराभव झाल्याचे जर्मनीस अर्थातच आवडलें नाहीं; त्याचप्रमाणें या युद्धांत सर्व्हियन लोकांचा जय झालेला पाहून ऑस्ट्रिया आंतल्या आंत जळफळूं लागला ! सर्व्हियास रशियाची सहानुभूति असून, आड्रियाटिक समुद्रापर्यंत आपलें राष्ट्र विस्तृत करावें अशी सर्व्हियाची महत्त्वाकांक्षा होती; व त्या महत्त्वाकांक्षेस अडथळा आण- ण्यासाठीं सर्व्हियाशीं युद्ध करावें म्हणून १९१३ मध्यें जर्मनी व आस्ट्रिया या राष्ट्रांनीं इटलीचें मन वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्या वेळीं साध्य झाला नाहीं. अशा प्रकारें युरोपियन राष्ट्रांचे दोन बलाढ्य संघ स्थापन झाले असून, बाल्कन द्वीपकल्पांतील अस्वस्थतेमुळे