पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ वें. ] गेल्या चाळीस वर्षांतील युरोपियन राजकारण. ३६५ 'घालणार नाहीं असें जर्मनीनें अभिवचन दिल्यानें युद्धाचा प्रसंग तड- जोडीनें टळला ! याच वर्षी आफ्रिकेंतील ट्रिपोली प्रदेशासंबंधानें इटलीनें टर्की- विरुद्ध युद्ध जाहीर करून तो प्रांत हस्तगत केला; व त्यावर इटलीचें पूर्ण वर्चस्व बसविलें. सरतेशेवटीं टर्कीला आपल्या साम्राज्यांतील अंतस्थ -गडबडीकडे लक्ष द्यावयाचें असल्यामुळे नाइलाजास्तव इटलीशीं १८ आक्टोबर १९९२ रोजी लॉसनी या ठिकाणी तह करावा लागून, आफ्रिका खंडांतील आपल्या उरलेल्या एका वसाहतींसही मुकात्रें लागलें. या वेळीं टर्कीच्या साम्राज्यांत अंतस्थ खळबळ सुरू होती. १८९९ पासूनच टर्कीच्या अंमलाखाली असलेल्या मॅसिडोनिया प्रांतांतील ख्रिश्चन जनतेचे, महमदीधर्मीय टर्कीच्या मगरमिठींतून आपली सुटका करण्याचे प्रयत्न चालू असून, बल्गेरिया, सर्व्हिया, माँटेनिग्रो, रुमानिया वगैरे बाल्कन द्वीपकल्पांतील लहान लहान संस्थानांचें मॅसिडोनियांमधील जन- तेस पाठबळ होतें. अशाप्रकारें मॅसिडोनियामध्यें अस्वस्थता माजली असून १९१२ चे सुमारास तर ती अगदी तीव्रतेस पोहोंचून बंडखोर लोकांच्या टोळ्या सर्व प्रांतांत धुमाकूळ घालूं लागल्या. तेव्हां त्याचा प्रतिकार करण्यासाठीं टर्कीकडून, नेहमीप्रमाणे कडक उपाय योजण्यांत आल्यामुळे संबंधीं प्रश्न १९१२. तर तेथील जनता अगदींच बिथरून गेली ! या वाकद्वीपकल्पाचें इटलीशीं युद्ध सुरू असून तें राष्ट्र अगदीं खालावत चाललें होतें, व थोड्या वर्षांपूर्वी बॉस्निया व हर्झगोव्हिना हे प्रांत आस्ट्रियानें आपल्या ताब्यांत घेतल्यामुळे सर्व्हियन लोकांच्या त्या दिशेकडील महत्त्वाकांक्षेस अडथळा येऊन दक्षिणेकडेच कायतो आपल्या महत्त्वाकांक्षेस वाव आहे असें त्यांस वाटूं लागलें. टर्कीच्या अमलाखालीं असलेल्या मॅसिडोनिया प्रांतांतील लोकांना बल्गेरियन लोकांची सहानुभूति होतीच ! अशा प्रकारें टर्कीच्या