पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण सुलतानास पदच्युत करण्यांत येऊन टर्कीच्या साम्राज्यासंबंधानें कांहीं तडजोड करण्यांत आली. परंतु या नवीन घटनेप्रमाणें सर्व्हिया, माँटेनिग्रो या दोन टर्कीच्या मांडलिक असलेल्या संस्थानाच्या हितसंबंधास बाध येत होता तेव्हां, आपणास टर्कीकडून नुकसानभरपाई मिळावी असें या दोन बारक्या राष्ट्रांनीं आपलें म्हणणें पुढें मांडलें. टर्कीचें साम्राज्य विस्खलित करून आपली सत्ता भूमध्यसमुद्रापर्यंत नेऊन भिडवावी अशी रशियाची अजूनही महत्त्वाकांक्षा असल्यामुळे ' सर्व्हिया व माँटेनिग्रो या स्लाव्ह जातीच्या राष्ट्रांस रशियाकडून पाठबळ मिळालें; व आतां रशिया व टर्की यांच्यामध्यें पुनः युद्ध उपस्थित होतें कीं काय असें वाटूं लागलें. परंतु यावेळीं आस्ट्रिया व जर्मनी हीं दोन प्रमुख राष्ट्र मध्ये पडून त्यांनीं टर्कीला मदत करण्याचें आपलें धोरण जाहीर केल्यानें, राशियास माघार घ्यावी लागली ! तेव्हां अर्थातच बिचाऱ्या 'सर्व्हिया ' या बारक्या राष्ट्रास कोणाचेंच पाठबळ न मिळून त्यास आपलें म्हणणें परत घ्यावें लागलें. अशा प्रकारें टर्कीच्या अंतस्थ बाबीसंबंधानें उपस्थित होणारें युद्ध अकल्पित रीतीनें टळलें. वरील प्रसंग होऊन दोन वर्षे लोटलीं नाहींत तोंच पुनः एकदां मोरोक्को प्रकरणासंबंधानें युरोपियन युद्ध उपस्थित होतें कीं काय असें वाटूं लागलें. मोरोक्कोमधील युरोपियन रहिवाशांस धोका येण्याचा संभव आहे असें वाटून फ्रेंच सैन्यानें १९११ मध्यें फेझ नांवाचें शहर काबीज केलें. फ्रान्सचें हें कृत्य पहातांच जर्मनीनें अगडीर या बंदराकडे आपलें एक सशस्त्र क्रूझर रवाना करून फ्रान्सला धमकी दिली ! आतां मोरोक्को प्रकरणासंबंधानें जर्मनी व फ्रान्स यांच्यामध्यें युद्ध उपस्थित होणार असा रंग दिसूं लागला; परंतु या वेळीं जर्मनीनें फ्रान्सवर स्वारी केल्यास आपण त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करूं असें इंग्लिश मुत्सयांनीं जाहीर केल्यामुळे, हातघाईचा प्रसंग न आणतां, फ्रेंच काँगो प्रांतांतील कांहीं प्रदेश आपणांस मिळाल्यास, आपण मोरोक्को प्रकरणांत हात