पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ वें. ] गेल्या चाळीस वर्षांतील युरोपियन राजकारण. ३६३ एकमेकांमध्यें सलोख्याचे संबंध घडून येण्यास बरीच मदत झाली. रशियाचा जपानकडून पराभव झाल्यानंतर रशियाच्या पूर्वेकडील वाढीस अर्थातच प्रतिबंध होऊन या दोन राष्ट्रांमध्यें खटका उडण्याचा संभव बराच कमी झाला. याखेरीज १९०७ मध्यें, इंग्लंड व रशिया यांच्या मधील स्नेहसंबंध १९०७. इराण, अफगाणिस्थान व तिबेट या प्रदेशांत दोन्ही राष्ट्रांचे हितसंबंध येत असल्यानें, त्याबद्दल तह करण्यांस आला ! अशा रीतीनें जर्मनीच्या वर्चस्वाखालीं असलेल्या आस्ट्रिया व इटली या त्रिपुटी संघाशी सामना देण्यासाठींच कीं काय इंग्लंड, फ्रान्स व राशिया या राष्ट्रांमध्यें तहनामें करण्यांत आले. अशा प्रकारें प्रमुख युरोपियन राष्ट्रांचे राजकीय संघ स्थापन होत असतां, टर्कीच्या साम्राज्यांत या वेळीं होत असलेल्या अंतस्थ घडामोडीनें एखादें मोठें युरोपियन युद्ध सुरू होतें कीं काय टर्कीच्या साम्राज्यांतील अशी भीति वाटूं लागली ! १९०८ च्या जुलै महिन्यांत ' तरुण टर्कस् ' नांवाच्या एका राजकीय खळबळ १९०८. सुधारणावादी प्रागतिक पक्षाच्या प्रेरणेनें मोठी खळबळ उडून टर्कीच्या सुलतानास लोकनियंत्रित राज्यपद्धतीस मान्यता यावी लागून, प्रति- निधिमंडळ बोलाविणें भाग पडलें. टर्कीनें अशा रीतीनें लोकनियंत्रित राज्यपद्धतीचा अंगिकार केल्यानंतर त्या राष्ट्राचें पुनरुज्जीवन होऊन, पूर्वीप्रमाणें तें एक बलढ्य राष्ट्र होईल अशी आशा वाटूं लागली होती; परंतु या वेळीं टर्कीच्या अंतस्थ खळबळीचा फायदा घेऊन, ऑस्ट्रियानें बोस्निया व हर्झगोव्हिना या प्रांतावर आपलें पूर्णपणें वर्चस्व बसविलें, व याखेरीज बागेरियाच्या मांडलिक संस्थानिकानें तर टर्कीचें सार्वभौमत्व झुगारून देऊन आपलें राष्ट्र स्वतंत्र असल्याचे जाहीर केलें ( ५ आक्टो- बर १९०८ ). यावेळीं टर्कीमध्यें अंतस्थ राज्यक्रान्ति सुरू असल्यामुळे पर- कीय सत्तेशीं तोंड देण्याचें टर्कीमध्यें मुळींच सामर्थ्य नव्हतें; यानंतर