पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण होती ती नाहींशी करून पूर्ववत् सर्वत्र स्थिरस्थावर करण्यासाठी फ्रेंच सरकार आर्थिक मदत करण्यास तयार आहे असे सुचविलें (१९०५). परंतु यावेळी आशिया खंडांत रशियाचा जपानकडून पराभव झाल्यामुळे रशियाची युरोप- खंडांतील इभ्रत कमी झाली आहे हें पाहतांच जर्मनीनें पूर्वीचें धोरण अर्थात्व बदललें ! फ्रान्सकडून मोरोक्कोच्या अंतस्थ बाबीमध्ये हात घालण्याचा प्रयत्न होत आहे हें पहातांच जर्मन बादशहा कायसर वुइल्यम यानें मोरोक्कोमध्ये जाऊन, तेथील सुलतान स्वतंत्र आहे तेव्हां त्याच्या अंतस्थ व्यवस्थेंत फ्रान्सनें हात घालण्याचें कांहींच कारण नाहीं, व मोरोक्को - मधील जर्मन हितसंबंधास फ्रान्सच्या या सूचनेमुळे अर्थात्च बाध येईल असें जाहीर केलें; व मोरोक्को प्रकरणासंबंधी सर्व युरोपियन मोरोक्को प्रकरण १९०६. राष्ट्रांची परिषद भरविणें अत्यावश्यक असल्याची सूचना केली. कायसर वुइल्यमच्या सूचनेप्रमाणें स्पेनमधील अलजेसिरास या ठिकाणी एक अंतर्रा- ष्ट्रीय परिषद भरविण्यांत आली, परंतु यावेळीं रशिया, इंग्लंड व इटली या राष्ट्रांनी फ्रान्सलाच दुजोरा दिला होता, व आस्ट्रियानें तटस्थ वृत् स्वीकारली असल्यामुळें या परिषदेचा निकाल जर्मनीविरुद्धच झाला ! यावेळीं मोरोक्कोचें स्वातंत्र्य सर्व राष्ट्रांनीं कबूल केलें खरें, परंतु तेथील राष्ट्रीय पेढीमध्यें फ्रान्सचाच कायतो संबंध असावा असें ठरविण्यांत आलें ! अशा प्रकारें, १९०५ च्या सुमारास रशियाचा जपानकडून पराभव होऊन रशियाची चमत्कारिक स्थिति झाली असतां, फ्रान्स व इंग्लंड यांच्यामध्यें नुकताच घडून आलेला स्नेहसंबंध कितपत दृढ आहे हें आजमावून पहा- याच्याच इराद्यानें जर्मनीनें 'मोरोक्का प्रकरण' उपस्थित केलें असें दिसतें! परंतु गेल्या एकदोन वर्षांत ( १९०४ - १९०७) घडून आलेल्या प्रसंगामुळे रशिया व इंग्लंड यांच्यामधील पूर्वी असलेलें वितुष्ट नष्ट होऊन,