पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ वें. ] गेल्या चाळीस वर्षांतील युरोपियन राजकारण. ३६१ रशियाला जपानशीं पोर्टस्माऊथ ( अमेरिका ) येथें तह करण भाग पडलें. या तहानें मँचूरिया प्रांत व लॅओटॅग द्वीपकल्प जपानला मिळालें. या युद्धांत जपानकडून पराभव होऊन रशियाच्या पूर्वेकडील वाढीस प्रतिबंध झाल्यानें रशिया व इंग्लंड यांमध्यें अशिया खंडांतील प्रदेशा- संबंधानें खटका उडण्याचा संभव बराच कमी झाला ! परंतु रशियाचा अशा रीतीनें एका पौर्वात्य राष्ट्रानें पराभव केलेला पाहून रशियाची युरोप- खंडांतील इभ्रत कमी होऊन, जर्मनीच्या नेतृत्वाखालीं स्थापन झालेला त्रिपुटी संघ अर्थातच अप्रत्यक्ष रीतीनें बलाढ्य होऊं लागला ! यावेळी रशियामध्यें अंतस्थ गडबड सुरू असून १९०५ मध्यें निरनिराळे संप उद्भुत झाल्यामुळें तर रशियाची स्थिति फारच चमत्कारिक होऊं लागली ! इकडे या सुमारास इंग्लंड व फ्रान्स यांच्यामध्यें सलोख्याचे संबंध होण्याचें घाटूं लागलें ! पूर्वी वसाहतींच्या प्रकरणांतच या दोन्ही राष्ट्रांमध्ये वितुष्ट आलेलें होतें; परंतु आतां त्या बाबींमध्यें कांहीं तडजोड करावी असें दोन्ही राष्ट्रांस वाटूं लागलें ! इजिप्तसंबंधीं फ्रान्सने इंग्लंडला पूर्ण मुक- त्यारी द्यावी, व इंग्लंडनें मोरोक्कोच्या बाबतींत कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करू नये अशा प्रकारची तडजोड करण्यांत आली. याखेरीज सयाम, पश्चिम आफ्रिका, मॅडागास्कर, न्यू हिब्रेडीस, न्यू फाउंडलंड वगैरे प्रदेशांसंबंधीं या दोन्ही राष्ट्रांचे हितसंबंध संलग्न असल्यानें त्या बाबींतही कांहीं तडजोड करण्यांत आली. अशा प्रकारें फ्रान्स व इंग्लंड यांच्यामध्यें मोरोक्को प्रकरणासंबंधीं कांहीं तह होत आहे, ही बातमी जर्मन प्रधानास नव्हती असें नाहीं, तर तह होण्यापूर्वी, कौंट ब्यूलो-या जर्मन प्रधानानें या तहान्वयें मोरोक्को प्रकरणांत जर्मनीच्या व्यापारविषयक हितसंबंधांत कांहीं बाध येत नाहीं असें 'राइस्टॅग' या सभेंत जाहीर केलें. अशाप्रकारें इंग्लंडनें मोरो- को प्रकरणांतून आपला हात काढून घेतल्यावर, मोरोक्कोमध्यें बेबंदशाही माजली २३