पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण इकडे अशियाखंडांतील आपल्या ताब्यांत असलेल्या 'हिंदुस्थान ' -या विस्तीर्ण प्रदेशास रशियाकडून धोका पोंचूं नये म्हणून इंग्लंडला राश- याच्या आशियाखंडांतील हालचालीकडे डोळ्यांत तेल घालून पहावें लागलें. रशियाच्या आशियाखंडांतील विस्तारापासून इंग्लंडप्रमाणें जपानला धोका वाटत असल्यामुळे, इंग्लंड व जपान या दोन राष्ट्रांमध्ये १९०२ मध्ये तह होऊन, जपानवर एकापेक्षां अधिक राष्ट्रांकडून हल्ला झाला तर जपान- - ला मदत करण्याचें इंग्लंडने अभिवचन दिलें. या वेळीं कोरिया प्रांतांत रशिया आपलें वर्चस्व प्रस्थापित करीत असून रुसो - जपानी युद्ध हलके हलके मँचुरिया प्रांत देखील घशांत टाक- ण्याचा रशियाचा विचार होता; तेव्हां याबद्दल रशियानें आपला हात आंखडता घ्यावा म्हणून जपाननें कांहीं सूचना पाठविल्या ( १९०३). परंतु या सूचनांचा कांहींच विचार न करतां रशि- -यानें त्या फॅटाळून लावल्यानें, मँचुरियामधील आपल्या हितसंबंधास रशियाकडून बाध येत असल्यामुळे जपाननें १९०४ च्या फेब्रुवारी महि- न्यांत रशियाशी युद्ध जाहीर केलें. १९०४-५. अशा प्रकारें रुसो - जपानी युद्ध सुरूं झाल्यावर युद्ध- • क्षेत्रापासून जपान जवळ असल्यामुळे जपानला एकदम आपलें सैन्य रण- भूमीवर दाखल करतां येणें शक्य होतें; परंतु रशियास आपलें सैन्य फार लांबून सैबेरियाच्या ओसाड प्रदेश ओलांडून आणावें • लागत असल्यामुळे, रशियाची स्थिति फारच चमत्कारिक झाली ! या- • खेरीज रशियाचा प्रतिकार करून रशियाची आशियाखंडांतील हालचाल - बंद करण्यासाठी सर्व जपान राष्ट्र खवळलें होतें व राशियाचें राष्ट्र बलाढ्य असले तरी तेथील लोकांस हें युद्ध चालविण्यास हुरूप वाटत नसल्यानें राशियास या युद्धांत जपानकडून हार खावी लागणार -असें वाटूं लागलें. सरतेशेवटीं आरमारी लढाईंत रशियन आरमाराचा “फडशा उडून जपानचा जय झाला व १९०५ च्या जून महिन्य