पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ वें. ] गेल्या चाळीस वर्षांतील युरोपियन राजकारण. ३५९ वसाहतीस धोका पोंहचंं नये या हेतूनें फ्रान्सचें वितुष्ट संपादन करावें लागलें ! अशा रीतीनें परकीय शत्रूशीं आपला केव्हां खटका उडेल, व आपल्या चारी खंडांत पसरलेल्या साम्राज्यास परकीय शत्रूपासून केव्हां धोका पोंहचेल याची कांहींच शाश्वती वाटत नसल्यानें इंग्लंडला आपलें आरमारी सामर्थ्य वाढविणें अत्यावश्यक वाटून आपणास आणीबाणीच्या वेळी मदत मिळावी म्हणून कोणत्या तरी बलाढ्य संघास सामील होण्याची: अवश्यकता वाटूं लागली ! दोन बलाढ्य राष्ट्रांच्या तोडीचें इंग्लंडचें आरमार. अशा रीतीनें विसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच इंग्लंडच्या धोर- णांत बदल झाल्यामुळे इंग्लंडनें आपलें आरमार जय्यत तयार ठेवण्याची खटपट सुरू करून कोणत्याही दोन प्रबल राष्ट्रांच्या आरमाराच्या तोडीचें आपलें आरमार राखण्याचा प्रयत्न करण्यांत आला ! अशा रीतीनें आपल्या आरमाराची जय्यत तयारी ठेवण्याची इंग्लंडकडून खट- पट करण्यांत आली, ती कांहीं चैनीची गोष्ट म्हणून करण्यांत आली नसून, आपलें समुद्रवेष्टित चिमुकलें राष्ट्र, आपला व्यापार, आपल्या चारी खंडांत पसरलेल्या वसाहती व आपल्या अंकित असलेले इतर प्रदेश या सर्वांचें परकीय शत्रूपासून संरक्षण व्हावें म्हणूनच इंग्लंडला आरमाराचें अभेद्य कवच आपल्या भोवताली गुरफटून घ्यावें लागलें. परंतु इंग्लंडकडून असा प्रयत्न चालला असतां १९०० सालापासून इंग्लंडच्या आरमारी वर्चस्वास आव्हान करण्यासाठींच कीं काय जर्मनीकडून आपलें आरमार एकसारखें वाढविण्याचे प्रयत्न होऊं लागले ! आरमारी व लष्करी खर्चासाठी दर वर्षी जर्मनीकडून कोट्यवधि • रुपये खर्च होऊं लागले; व आपल्या आरमाराच्या जोरावर आपली वसा- हतींची देखील वाढ करावी अशा प्रकारचे प्रयत्न होऊं लागले ! तेव्हां जर्मनीकडून १९०० सालापासून अशा प्रकारचे प्रयत्न होत असतां आपल्या आरमारी वर्चस्वास कोणापासून धोका असेल तर तो जर्मनी -- पासूनच होय अशी इग्लडची खात्री झाली.