पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण हेग येथें स्थापन झालेल्या कोर्टाचे निकाल कोणत्याही राष्ट्रास बंधनकारक नसल्यामुळे हें कोर्ट असून नसून सारखेच होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं ! इंग्लंड द्विपूटी संघास जाऊन मिळतें. तेव्हां विसाव्या शतकाच्या प्रारंभीं युरोपकडे दृष्टि फेंकल्यास, राशिया व फ्रान्स यांचा द्विपुटी संघ, व जर्मनी, ऑस्ट्रिया व इटली यांचा त्रिपुटी संघ, असे दोन बलाढ्य संघ अस्तित्वांत असलेले आपणास आढळून येतील ! इंग्लंड मात्र आपल्या नेहमींच्या धोरणास अनुसरून या दोन्हीही संघांपासून अलग होतें. परंतु या विसाव्या शतकाच्या प्रारंभीं झालेली मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लंडनें आपला नेहमींचा अलगपणा सोडून रशिया व फ्रान्स यांच्या द्विपुटी संचाकडे जाऊन मिळणें ही होय ! विसाव्या शतकाच्या प्रारंभी इंग्लंडने आपला नेहमींचा अलगपणा सोडून द्विपुटी संघाकडे जाऊन मिळण्याचें ठरविलें, तें कांहीं इंग्लंडच्या मनांत एकदम कांहीं विचार येऊन ठरविलें असें नव्हे तर तसें घडण्यास तशींच कांहीं कारणें घडलीं, तीं कोणतीं हें आतां पाहिलें पाहिजे. इंग्लंडने गेल्या शतकांत जगाच्या चारी खंडांत आपल्या वसाहती स्थापन केल्या असून त्यांस स्वराज्याचे हक्क दिले असल्यामुळे विसाव्या शतकाच्या प्रारंभी ह्या वसाहती म्हणजे मोठमोठालीं संपन्न राष्ट्रेंच झालेली. होतीं ! ब्रिटिश साम्राज्यांत मोडणाऱ्या या संपन्न राष्ट्रांचें केंद्रस्थान इंग्लंड असून आपल्या चारी खंडांत पसरलेल्या साम्राज्याचें परकीय शत्रूपासून संरक्षण करण्याची जबाबदारी इंग्लंडवर पडूं लागली ! अशा प्रकारची. जबाबदारी इंग्लंडवर असल्यामुळे हिंदुस्थानास धोका पोहचून हिंदु- स्थान. आपल्या हातचें जाऊं नये म्हणून इंग्लंडला गेल्या शतकांत रशियाच्या आशियाखंडांतील हालचालीकडे लक्ष ठेवावें लागून राशि- याचें वैर संपादन करावें लागलें; त्याचप्रमाणें आफ्रिकेतील आपल्या