पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ वें. ] गेल्या चाळीस वषाताल युरोपियन राजकारण. ३५७ पैशाचा अशा अनवश्यक गोष्टींकडे खर्च होऊं नये म्हणून सूचना येऊं लागल्या ! या कामी रशियाचा झार दुसरा निकोलस यानें पुढाकार घेऊन “ प्रत्येक राष्ट्रानें शांतताप्रिय बनून आपापला लष्करी खर्च कमी करावा' अशी सूचना करणारें एक पत्रक १८९८ मध्ये प्रसिद्ध केलें. यानंतर या प्रश्नांचा शांतपणे विचार करण्यासाठीं युरोपियन राष्ट्रांतील प्रतिनिधींची एक अंतर्राष्ट्रीय परिषद भरविण्यांत यावी, अशा प्रकारच्या सूचना येऊं लागल्या. सरतेशेवटी १८९९ मध्यें हेग येथें या प्रश्नाचा विचार करण्यासाठीं एक परिषद भरविण्यांत येऊन त्यामध्यें २६ युरोपियन राष्ट्रांकडून प्रतिनिधी आलेले होते. या परिषदेकडून इतर पुष्कळ बाबींसंबंधानें विचार करण्यांत आला, परंतु वरील मोठ्या महत्त्वा- हेग येथील अंतर्राष्ट्रीय शांतता - परिषद १८९९. च्या प्रश्नासंबंधानें - लष्करी सामर्थ्य कमी करण्यासंबंधानें- या परिषदेमध्यें कांहींच ठरलें नाहीं. या परिषदेची बैठक चालूं असतां जर्मन प्रतिनिधीनें - काढलेले उद्गार ध्यानांत ठेवण्यासारखे आहेत, व ते 'उद्गार म्हणजे " सर- कारकडून लष्करी सामर्थ्य वाढविण्यासंबंधानें होत असलेल्या खर्चामुळे आपणावर जादा कराचे ओझें लादलेलें आहे असें जर्मन जनतेस मुळींच वाटत नाहीं ! " अशा प्रकारें या महत्त्वाच्या बाबीसंबंधानें या परिषदेमध्यें नक्की असें कांहींच न ठरतां ' प्रत्येक राष्ट्रानें लष्करी खर्च कमी केल्यास त्यापासून प्रत्येक राष्ट्राचा फायदा होईल' अशा प्रकारची पोकळ सूचना मात्र या परिषदेमध्यें पास करण्यांत आली. अशा रीतीनें या महत्त्वाच्या प्रश्नासंबंधानें जरी या परिषदेत कांहींच ठरलें नाहीं तरी, या परिषदेमध्यें आंतर्राष्ट्रीय कायद्यामध्यें कांहीं महत्त्वाच्या सुधारणा कर- ण्यांत येऊन युद्ध उपस्थित झालें असतांना युद्धयमान राष्ट्रांनीं व तटस्थ राष्ट्रांनीं अमलांत आणावयाचे कांहीं नियम मात्र या परिषदेकडून ठर- विण्यांत येऊन राष्ट्राराष्ट्रांतील कलह तडजोडीनें मिटविण्यासाठी हेग येथें एक अंतर्राष्ट्रीय स्थायिक कोर्ट स्थापन करण्यांत आलें ( १८९९ ). परंतु