पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण या दोन राष्ट्रांचा द्विपुटी संघ स्थापन झाला ! या वेळीं इंग्लंडखेरीज इतर युरोपियन राष्ट्र या दोन बलाढ्य संघांपैकी कोणत्या तरी एका संघाकडे आपली सहानुभूति दर्शवूं लागलीं होतीं. इंग्लंड मात्र या दोन्ही संघांपासून अलग होतें, परंतु या वेळीं इंग्लंडचा जर्मनीच्या नेतृत्वाखालीं असलेल्या त्रिपुटी संघाकडेच कल होता असें आपणास दिसेल. फ्रान्स व इंग्लंड यांचा इजिप्तच्या प्रकरणांत ( १८८२) खटका उडण्यापर्यंत वेळ आली होती; व रशियानें एशियाखंडांत आपलें वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न चालवल्यामुळे रशिया व इंग्लंड यांचें मन एकमेकांविषयीं कलुषितच होतें ! तेव्हां अशा रीतीनें १८९६ च्या सुमारास द्विपुटी संघांतील दोन्ही राष्ट्रांबद्दल इंग्लंडचे सलोख्याचे संबंध नसल्यामुळे जर्मनीच्या नेतृत्वाखालीं • स्थापन झालेल्या द्विपुटी संघाकडेच इंग्लंडचा कल जावा यांत कांहींच नवल नव्हतें ! लष्करी सामर्थ्य वाढ- विण्याची युरोपियन राष्ट्रांमधील स्पर्धा. तेव्हां बर्लिनच्या तहापासून (१८७८) रशिया व फ्रान्स यांचा तह होईपर्यंत ( १८९६ ) युरोपियन राष्ट्रांच्या राजकारणां गुंतागुंत होऊन नवीन तहनामे होत असतांना सर्व युरोपियन राष्ट्रांमध्यें आपलें लष्करी सामर्थ्य वाढविण्याचीही स्पर्धा सुरू झालेली होती. १८७८ च्या नंतर इंग्लंडखेरीज इतर युरो- पियन राष्ट्रांनी आपापल्या राष्ट्रामध्यें सक्तीचें लष्करी शिक्षण सुरू करून आपलें लष्करी सामर्थ्य वाढविण्याची खटपट सुरू केली. प्रत्येक राष्ट्राकडून आपल्या आवाक्याबाहेर लष्करी खर्चासाठी रक्कम मंजूर होऊं लागली ! शिक्षण, सामाजिक व व्यापारविषयक सुधारणा, वगैरे उपयुक्त कामा- साठीं प्रत्येक राष्ट्राकडून रक्कम मंजूर न होतां; युद्धासंबंधीं विध्वंसक साधनें व युद्धसामुग्री निर्माण करण्याकडेच क्रोडोगणती रुपये खर्च होऊं लागले ! अशा रीतीनें पैशाचा एकसारखा अपव्यय सुरू असल्यामुळे प्रत्येक राष्ट्र लष्करी खर्चाखालीं दडपून जाऊं लागलें ! तेव्हां अर्थातच