पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ वें. ] गेल्या चाळीस वर्षातील युरोपियन राजकारण. ३५५ ठेवावें लागलें. परंतु रशियासारखें झारच्या अनियंत्रित सत्तेखालीं असलेलें राष्ट्र आपल्या लोकसत्ताक राष्ट्राशी तह करण्यास उद्युक्त होईल कीं नाहीं याबद्दल मात्र फ्रेंच मुत्सद्यांस जबरदस्त शंका वाटत होती ! परंतु फ्रान्सप्रमाणें रशियाला देखील मध्ययुरोपमध्यें स्थापन झालेल्या त्रिपुटी संघापासून भीति वाटत असल्यामुळे दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या बलाढ्य राष्ट्रांशी तह करण्याची अवश्यकता वाटू लागली होती. यापैकीं रशियाचें इंग्लंडशीं सलोख्याचे संबंध नव्हते इतकेंच नव्हे तर रशियाची दक्षिण युरोपमध्यें व आशियाखंडांत आपलें साम्राज्य विस्तृत करण्याची महत्त्वाकांक्षा असून इंग्लंडने रशियाच्या मार्गांत आपणा- कडून होईल तितके अडथळे आणण्याची पराकाष्ठा केल्यामुळें तर या दोन राष्ट्रांमध्यें वैमनस्य उत्पन्न झालें होतें. तेव्हां अशा रीतीनें मध्य युरोपमध्यें जर्मनीच्या नेतृत्वाखाली स्थापन . झालेल्या त्रिपुटी संघापासून रशिया व फ्रान्स या दोन्ही राष्ट्रांस सारखीच भीति वाटत असल्यामुळे या दोन्ही राष्ट्रांत एकमेकांविषयीं सहानुभूति उत्पन्न होऊन स्नेहभाव उद्भवूं लागला. १८८७ च्या सुमारास फ्रान्स व जर्मनी यांच्या सरहद्दीवरील एका प्रसंगानें युद्ध उपस्थित होतें कीं काय असें वाटूं लागलें होतें; परंतु त्यावेळी रशियानें फ्रान्सच्या वतीनें मध्यस्थी करून तो प्रसंग टाळला. हलके हलके फान्स व रशिया व फ्रान्स यांचा द्विी संघ १८९६. रशिया या दोन राष्ट्रांमधील हितसंबंध अधिक दृढ होऊं लागले; व १८९३ मध्ये या दोन राष्ट्रांमध्यें व्यापारविषयक तह करण्यांत आला. यानंतर १८९६ सालीं फ्रान्सचा प्रेसिडेंट फॅरे याने प्रेट्रोगाड येथें जाऊन रशियन झारला भेट दिली व या दोन राष्ट्रांमध्यें संरक्षक तह करण्यांत आला. अशा रीतीनें : १८९६ सालीं, जर्मनीच्या नेतृत्वाखालीं स्थापन - झालेल्या त्रिपुटी संघास सामना देण्यासाठींच की काय शिया व फ्रान्स