पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण तो प्रांत मिळाल्यास आपली अलगेरियामध्ये असलेली वसाहत अधिक विस्तृत करतां येईल असें वाटून फ्रान्सनें १८८१ सालीं ट्यूनीस प्रांत बळकावला. फ्रान्सच्या या कृत्याचा इटालियन राष्ट्रास अर्थातच त्वेष आला; परंतु फ्रान्सशी शस्त्र उपसण्यास आपण अगदींच असमर्थ आहोंत हें कळून चुकल्यामुळे दुसऱ्या एखाद्या बलाढ्य युरोपियन राष्ट्राचें सख्य संपादन केल्यावांचून इटलीला गत्यंतरच नव्हतें ! यावेळीं प्रिन्स बिस्मा- र्कनें आपल्या मुत्सद्देगिरीनें इटलीला आपल्या बाजूला वळवून घेतलें; व १८८३ मध्ये इटलीशीं तह करण्यांत आला. अशा रीतीनें १८८३ च्या सुमारास जर्मनी, ऑस्ट्रिया व इटली या तीन युरो- पियन राष्ट्रांचा एक त्रिपुटी संघ निर्माण झाला. या संघामुळे जर्मनी व ऑस्ट्रिया यांचा जरी फायदा झाला असला, तरी इटलीचा मात्र या तहापासून जर्मनी, ऑस्ट्रिया व इटली यांचा त्रिपुटी संघ. मुळींच फायदा न होता, इटलीचें उलट नुकसानच होऊन, अँड्रियाटिक समुद्रामध्यें ऑस्ट्रियाचें माजत चाललेलें प्रस्थ मात्र इटलीला मुकाट्यानें पहावें लागलें ! मध्य युरोपमध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया व इटली यांचा असा बलाढ्य संघ निर्माण झाल्यामुळें फ्रान्सला अर्थातच भीति पडली; व युरोपमधील एखाद्या बलाढ्य राष्ट्राशीं स्नेहसंपादन केल्यावांचून गत्यंतर नाहीं हैं। फ्रान्सला कळून चुकलें. तेव्हां आतां इंग्लंड किंवा रशिया यांपैकीं एखाद्या राष्ट्राशीं सख्य केलें तरच आपला निभाव लागेल असें फ्रेंच मुत्सद्यांना वाहूं लागलें. त्यांपैकी इंग्लंड व फ्रान्स यांच्यामध्यें सख्य होणें तर अगदींच अशक्य होतें; कारण या दोन राष्ट्रांमधील पूर्वीचे संबंध सलोख्याचे नसून १८८३ मध्ये इंग्लंडनें इजिप्त प्रांतावर आपलें वर्चस्व स्थापल्यामुळे तर या दोन राष्ट्रांमध्यें खटका उडण्याचा संभव होता, अशा रीतीनें इंग्लंड व फ्रान्स यांच्यामध्यें स्नेह-संबंध होणें अगदींच अशक्य असल्यामुळे फ्रान्सला रशियाचेंच सख्य संपादन करण्याकडे आपले लक्ष