पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ वें. ] गेल्या चाळीस वर्षांतील युरोपियन राजकारण. ३५३ व ती अडचण म्हणजे, इटली व ऑस्ट्रिया हीं दोग परत्रांपर्यंत एक- मेकांची हाडवैरी असलेलीं राष्ट्रं एकाच संघामध्यें कशीं सामील करून घ्यावयाची ही होय ! तेव्हां ही अडचण सहजरीत्या दूर करतां येणें शक्य नसल्यामुळें योग्य संधि मिळेतोंपर्यंत थांबण्याचेंच प्रिन्स बिस्मार्कनें ठरविलें; परंतु त्यास फार दिवस कांहीं थांबावे लागलें नाहीं; कारण १८८१ च्या सुमारास इटलीला आपल्या बाजूला मिळविण्याची त्यास संधि सांपडून १८८३ मध्यें जर्मनीनें इटालीशी तह केला. तिसऱ्या नेपोलियनने संयुक्त इटलीच्या संमतीशिवाय ऑस्ट्रियाशीं वेगळा तह केल्यापासून फ्रान्स व इटली या दोन राष्ट्रांमध्ये थोडक्याच वर्षांपूर्वी जडलेला स्नेहसंबंध नष्ट होऊं लागला; व त्यानंतर नेपोलि- यननें पोपच्या संरक्षणासाठी रोम शहरामध्यें ठेवलेलें फ्रेंच सैन्य पाहून तर नेपोलियनबद्दल इटालियन जनतेस तिटकाराच वाटूं लागला होता ! सरतेशेवटीं फ्रँको-जर्मन युद्धाच्या वेळीं नेपोलियनला रोम-- मधील सैन्य पॅरिस शहराच्या संरक्षणासाठीं पहिल्याप्रथम तेथून हालवावें लागलें, तेव्हां इटालियन लोकांनीं रोम शहर आपल्या ताब्यांत घेऊन त्या शहरास संयुक्त इटलीच्या राजधानीचा मान दिलेला होता. परंतु आपल्या या कृत्यानें फ्रान्स राष्ट्र पुढें मागें सूड उगविण्याचा प्रयत्न क फ्रान्स व इटली यांच्या- मध्ये वितुष्ट येतें. अशी इटलीला नेहमीं धास्ती वाटे ! रोमचें संस्थान पुनः पोपला मिळवून देण्याचा प्रयत्न फ्रान्सकडून होईल अशी इटलीला नेहमींच भीति वाटत होती.. अशाप्रकारें फ्रान्सविषयीं इटलीचें मन साशंक असतांना आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या ट्यूनीस या प्रदेशाबद्दल या दोन्ही राष्ट्रां- मध्यें खटका उडून इटलीला जर्मनीशीं स्नेहसंबंध करावा लागला. आफ्रि- केच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या ट्यूनीस प्रदेशाकडे इटलीचा डोळा असून तेथें इटालियन लोकांची वसाहत स्थापन करावी अशी इटलीची मनीषा होती. परंतु इटलीप्रमाणें फ्रान्सचाही त्या प्रदेशाकडे डोळा असून,