पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण लागलें ! परंतु या भागाकडे दृष्टि ठेवल्यास रशियाची व आपली टक्कर होणार हें देखील ऑस्ट्रियाला कळून चुकलें ! बाल्कन द्वीपकल्पामधील वर्चस्वासंबंधीं या दोन राष्ट्रांमध्ये चुरस लागलेली आहे हें जर्मनीचा मुख्य प्रधान प्रिन्स बिस्मार्क याच्या लक्षांत येतांच, आपण या दोन राष्ट्रांपैकी एकाचा पक्ष घेतल्यास आपला फायदा होण्याचा संभव आहे असें त्यास वाटूं लागलें. बर्लिनच्या तहामुळे (१८७८) राशयाचें आपणाविषयीं कलुषित मत झालें असल्याकारणानें रशिया आपल्याशी तह करण्यास उद्युक्त होणार नाहीं असें वाटून आस्ट्रियाशीं सख्य संपादन करण्याचा त्यानें निश्चय केला व लागलीच १८७९ च्या आक्टोबर महिन्यांत या दोन राष्ट्रांमध्यें तह करण्यांत आला. या तहान्वयें असें ठरलें कीं जर जर्मनी व ऑस्ट्रिया यांपैकीं जर्मनी व ऑस्ट्रिया यांचा तह १८७९. राष्ट्रावर रशियाकडून हल्ला झाला तर या तह करण्याऱ्या राष्ट्रांनीं आपल्या मित्रास मदत करावी; व जर रशियाखेरीज दुसऱ्या कोणत्या राष्ट्राकडून हल्ला करण्यांत आला तर या तहांत सामील असलेल्या राष्ट्रानें तटस्थ रहावें; परंतु जर रशियानें ऑस्ट्रिया किंवा जर्मनी यावर हल्ला करणाऱ्या एखाद्या राष्ट्रास मदत केली, तर मात्र तहांत सामील असलेल्या राष्ट्रानें आपल्या मित्रास तटस्थपणा सोडून मदत केली पाहिजे. अशा प्रकारें जर्मनी व ऑस्ट्रिया या दोन राष्ट्रांमध्यें करण्यांत आलेल्या तहाकडे पाहिलें म्हणजे केवळ रशिया व फ्रान्स यांच्याच भीतीनें हा तह करण्यांत आला होता असें म्हणावयास पाहिजे. परंतु या तहानें प्रिन्स बिस्मार्कचें कांहीं समाधान झालें नाहीं. आणखी एखाद्या राष्ट्रानें आपल्या या तहामध्यें सामील व्हावें असें बिस्मार्कला वाटूं लागलें. इटलीस जर आपल्या या संघांत सामील करून घेतां आलें तर आपला संघ युरोपमध्यें प्रबळ होईल व आपल्या विरुद्ध शस्त्र उपसण्यास युरोपियन राष्ट्रें धजावणार नाहींत अशी त्याची खात्री होती. परंतु प्रिन्स बिस्मार्क याच्या मार्गांत एक मोठी अडचण होती