पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

7. प्रकरण २२ वें. गेल्या चाळीस वर्षांतील युरोपियन राजकारण. गेल्या चाळीस वर्षांत युरोपियन राष्ट्रांच्या राजकारणामध्यें जी गुंता- गुंत झालेली आढळते, व सांप्रतच्या महायुद्धाच्या प्रारंभीं युरो- पियन राष्ट्रांचे जे दोन बलाढ्य संघ आढळतात, त्याचा उगम १८७८ सालीं झालेल्या बर्लिनच्या तहामध्यें आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. बर्लिन- च्या तहानें बाल्कन द्वीपकल्पांत करण्यांत आलेल्या व्यवस्थेमुळें रशियाच्या युरोपमधील महत्त्वाकांक्षेस अडथळा आला, व त्या प्रसंगी प्रिन्स बिस्मार्क या प्रख्यात जर्मन मुत्सयानें गोडगोड थापा देऊन आपणास फसविलें असें रशियास वाटत असल्यामुळे जर्मनीबद्दल रशियाच्या मनांत अढी उत्पन्न झाली. बाल्कन द्वीपकल्पाकडे रशियाच्या मार्गांत जरी अनेक अडचणी उपस्थित करण्यांत आल्या होत्या, तरी रशियानें त्या भागाकडील आपल्या महत्त्वाकांक्षेस कधींच फाटा दिलेला नसून, बाल्कन संस्थानांतील लोक आपणाशीं धर्म, आचार, विचार व जात यांनीं निगडित असल्यामुळे टर्कीच्या विरुद्ध दोन हात करण्याचा प्रसंग आल्यास आपणास या लहान लहान संस्थानांची पूर्ण सहानुभूति मिळेल असें रशियास वाटत होतें. परंतु या वेळीं बाल्कन द्वीपकल्पाकडे एकट्या राश- याचेंच लक्ष नसून त्या भागाकडे आपल्या मह- त्त्वाकांक्षेस वाव आहे असें नुकतेंच ऑस्ट्रियासही वाटू लागलें होतें. १८६६ मध्यें प्रिन्स बिस्मार्क याच्या मुत्सद्दोगरीनें ऑस्ट्रियाची जर्मनीच्या राजकारणांतून हकालपट्टी होऊन इटलीवरील आपल्या वर्चस्वास मुकावे लागल्यानें बाल्कन द्वीपकल्पाकडेच काय तो आपल्या महत्त्वाकांक्षेस वाव मिळण्याचा संभव आहे असें ऑस्ट्रियास वाटूं बाल्कुन द्वीपकल्पाकडे ऑस्टियाचें लक्ष.