पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण २१ वें . ] नंतर वसाहती स्थापन करून आपले साम्राज्य विस्तृत करण्याचे जर्मनी- कडून प्रयत्न करण्यांत येऊन आफ्रिका खंडांत जर्मनीनें दोन मोठाल्या वसाहती स्थापन केल्या ! परंतु इतर खंडांत मात्र इंग्लंडने बऱ्याच मुलखा- वर आपलें वर्चस्व प्रस्थापित करून तो मुलूख अडकावून ठेवला असल्यानें जर्मनीस इंग्लंडबद्दल हेवा वाटूं लागला ! इंग्लंडचें बलाढ्य आरमार व इंग्लंडच्या पांचही खंडांत पसरलेल्या वसाहती जर्मनीच्या डोळ्यांत सलूं लागल्या; व समुद्रावरील वर्चस्वासंबंधानें या दोन बलाढ्य राष्ट्रांमधील स्पर्धा अधिकच तीव्र होऊं लागली !